छत्रपती संभाजीनगर येथील घटना
३ धर्मांधांना अटक !
(रेशन म्हणजे सरकारकडून अल्प दरात मिळणारे आवश्यक अन्नधान्य व वस्तू)
छत्रपती संभाजीनगर – शहरात शासकीय अन्नधान्याची अनधिकृत विल्हेवाट लावणार्या आणि संघटित गुन्हेगारी करणार्या टोळ्यांवर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी अत्यंत कडक पावले उचलली आहेत. गरिबांच्या हक्काचा शिधा आणि लहान मुलांचा पोषण आहार काळ्या बाजारात विकणार्या कलीम कुरेशीच्या ६ जणांच्या सक्रीय टोळीवर शहर पोलिसांनी ‘मकोका’ (महाराष्ट्र नियंत्रण संघटित गुन्हेगारी कायदा) अंतर्गत कारवाई केली आहे.
१. गुन्हे शाखेने किराडपुरा भागातील प्रसिद्ध ‘एम्.आर्. फंक्शन हॉल’च्या तळमजल्यात असलेल्या गोदामावर १२ जून या दिवशी धाड घातली होती. यात शासकीय रेशनिंगचा गहू, तांदूळ, मका, ज्वारी आणि साखर यांची शेकडो पोती जप्त करण्यात आली. अंगणवाड्यांमधील ६ महिने ते ३ वर्षे वयोगटांतील बालके, गरोदर महिला आणि स्तनदा माता यांच्यासाठी ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजनें’तर्गत येणार्या अत्यंत पौष्टिक अशा पोषण आहाराची शेकडो पाकिटेही या टोळीने काळ्या बाजारात विकण्यासाठी दडवून ठेवली होती.
२. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण १७ लाख ६ सहस्र ५०० रुपयांचा सरकारी माल जप्त केला असून जिन्सी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत २ स्वतंत्र गुन्हे नोंद केले आहेत.
३. या गुन्ह्याचे स्वरूप संघटित असून याचा मुख्य सूत्रधार कलीम कुरेशी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी थेट ‘मकोका’ लावला आहे. धर्मांध समीर बाबर कुरेशी, फहाद लईक शुत्तारी आणि फरदीन गणी पठाण या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. टोळीप्रमुख कलीम छोटू कुरेशी आणि त्याचा मुख्य साथीदार शेख अजहर शेख चाँद कुरेशी हे धाड घातल्यापासून पोलिसांना गुंगारा देऊन पसार आहेत, तसेच आवेज कुरेशी नावाच्या आणखी एका आरोपीचा शोध चालू आहे.
४. ‘मकोका’अंतर्गत कारवाई झाल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा आणि पसार झालेल्या रेशन माफियांचे पुढील अन्वेषण साहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक
दाबोळी येथे दीड कोटी रुपये किमतीचे पेट्रोल कह्यात
मुंबईतील पूर्व समुद्रकिनार्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास !
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !