अन्य एका घटनेत अन्वर शेखने कोयता दाखवून नागरिकांना धमकावले
मुंबई – माहीम येथे रेल्वेस्थानकाबाहेर नवीन प्रसन्न यांच्यावर एका आरोपीने चाकूने वार केले आहेत. आरोपीला प्रसन्न यांचा चुकून धक्का लागला आणि त्याचा भ्रमणभाष पडला. त्यावर प्रसन्न यांनी त्याची क्षमा मागितली, तरीही त्याने त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर थेट चाकूनेच आक्रमण करून वार केले. त्यामुळे गंभीर घायाळ झालेले प्रसन्न यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. रात्री १० वाजता ही घटना घडली. प्रसन्न यांनी साहाय्यासाठी आरडाओरडा केला; मात्र त्या इसमाने चाकूचा धाक दाखवून अन्य नागरिकांना भीती दाखवली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर अन्वर शेख (वय २२ वर्षे) याने प्रवाशांवर धारदार कोयता उगारला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी शेख याला कह्यात घेतले आहे. सुदैवाने या घटनेत कुणी घायाळ झाले नाही. पोलीस घटनास्थळी पोचले, तेव्हा तो हातात कोयता घेऊन मोठ्याने ओरडत होता. तसेच येणार्या-जाणार्या लोकांकडे धावत होता. पोलिसांनी त्याला मागून घेरले आणि त्याच्या हातातून कोयता हिसकावून घेतला. त्याच्यासमवेत त्याची पत्नी होती आणि तो तिच्यावर आक्रमण करणार कि काय असे वाटत होते. पत्नीने सांगितले की, ते फिरायला आले होते. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर अन्वर शेखने त्याच्या बॅगेतून कोयता काढून महिलेला आणि आजूबाजूच्या इतरांना धमक्या देण्यास आरंभ केला. शेख याच्याविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक
दाबोळी येथे दीड कोटी रुपये किमतीचे पेट्रोल कह्यात
मुंबईतील पूर्व समुद्रकिनार्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास !
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
श्री कटमगाळदादा देवाकडे गार्हाणे घालून फर्मागुडी येथील प्रस्तावित ‘आयआयटी’ला काही जणांचा विरोध