
वास्को – गुन्हे शाखेने २७ जून या दिवशी दाबोळी येथे अनधिकृतरित्या इंधन साठवणूक केलेल्या ठिकाणी धाड घालून अनुमाने दीड कोटी रुपये किमतीचे ६ इंधन टँकर, १ टिपर ट्रक आणि पेट्रोलियम पदार्थ कह्यात घेतले. अनुमाने ६ घंटे चाललेल्या या कारवाईच्या वेळी अधिकार्यांना टँकरमध्ये संशयास्पद पेट्रोलियम पदार्थ साठवून ठेवलेले आढळले. त्याचे नमुने फॉरेन्सिक पडताळणीसाठी घेण्यात आले आहेत. प्राथमिक अन्वेषणात हे पेट्रोलियम पदार्थ काळ्या बाजारात विक्रीसाठी वळवले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणानुसार संबंधित भूमी आणि कह्यात घेण्यात आलेली वाहने सांकवाळ येथील देवेंद्र नाईक उपाख्य राजू चव्हाण यांच्या मालकीची आहेत.
तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक
मुंबईतील पूर्व समुद्रकिनार्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास !
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !
श्री कटमगाळदादा देवाकडे गार्हाणे घालून फर्मागुडी येथील प्रस्तावित ‘आयआयटी’ला काही जणांचा विरोध