
नाशिक – २८ जून ते २५ ऑक्टोबर या कालावधीत ‘मिशन ग्रीन मॉन्सून’ राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर फाशीचा डोंगर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. या वेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. या अभियानाच्या अंतर्गत १ लाख रोपांची लागवड करण्यात येईल.
वाढते तापमान, ‘अल्-निनो’चे संकट आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे. त्यासाठी ‘हरित नाशिक’ उपक्रम ही लोकचळवळ व्हावी. या चळवळीत प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे या वेळी केले.
महाजन म्हणाले की, नाशिक शहरात ‘उन्नत नाशिक अभियान’ राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सकाळी कपिला नदी महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. नागरिकांनी हरित नाशिकसाठी आपले योगदान दिले पाहिजे. कचर्याचे वर्गीकरण केले पाहिजे. रस्त्यावर कचरा टाकू नये. मध्य प्रदेशातील इंदूर शहराच्या धर्तीवर आपण स्वच्छता राखली पाहिजे.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !