हिंदु जनजागृती समितीची अहिल्यानगर येथे निवेदनाद्वारे मागणी !

अहिल्यानगर – ‘अहमदनगर’चे ‘अहिल्यानगर’ आणि ‘औरंगाबाद’चे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण होऊन बराच कालावधी लोटला; मात्र विविध राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील दिशादर्शक फलकांवर अजूनही जुन्याच नावांचा उल्लेख आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो. अधिकृत शासकीय निर्णयाची प्रभावी कार्यवाही झालेली दिसत नाही. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर येथे जाणार्या सर्व महामार्गांवरील दिशादर्शक अन् अंतर दर्शवणारे फलक, तसेच शहरांच्या हद्दीतील जुने फलक पालटून नव्या नावांचे फलक तातडीने लावावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना देण्यात आले. ‘प्रशासनाने येत्या ७ दिवसांत कार्यवाही चालू न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल’, अशी चेतावणीही निवेदनातून देण्यात आली आहे.
गीते यांनी निवेदन स्वीकारून यासंदर्भात सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री रामेश्वर भुकन, जिल्हा हिंदु संघटक बापू ठाणगे, हिंदुत्वनिष्ठ संजय जोशी, दिगंबर गेंट्याल, चैतन्य शेकडे, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कल्याण येथे नालेसफाईसाठी बालकामगाराचा वापर; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंद
सातारा येथे व्यावसायिक लाभासाठी महामार्गावरील रस्ते दुभाजक फोडले
तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक
दाबोळी येथे दीड कोटी रुपये किमतीचे पेट्रोल कह्यात
मुंबईतील पूर्व समुद्रकिनार्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास !