
ढाका (बांगलादेश) – मयमनसिंह जिल्ह्यातील तारकंडा उप-जिल्ह्याच्या रामचंद्रपूर गावातील नाथबारी काली मंदिरात अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या अंधारात श्री कालीमाता आणि भगवान महादेव यांच्या मूर्तींसह एकूण ४ मूर्तींची तोडफोड केली. सकाळी प्रार्थना करण्यासाठी मंदिरात पोचल्यावर स्थानिक हिंदु भाविकांना ही घटना समजली. स्थानिक हिंदु समाजाने या प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली आहे.

या घटनेचा ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ने निषेध केला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘या प्रकरणी आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल’, असे पोलिसांनी सांगितले.
(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
बांगलादेशात धर्मांध मुसलमानांकडून एकाच हिंदु कुटुंबातील चौघांची हत्या
पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार
Germany Grooming Gangs : जर्मनीमध्येही यूकेसारखी ‘ग्रूमिंग गँग’ !
.. तर इराणचे अस्तित्वच संपवून टाकू ! : Donald Trump Threatens Iran
मंदिर विश्वस्तांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपावे ! – गोमंतक मंदिर महासंघ