
सातारा, २८ जून (वार्ता.) – ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या माध्यमातून टी.सी.एस्., स्टेट बँक ऑफ इंडिया आणि विप्रो आस्थापनातील उच्चविद्याविभूषित हिंदू मुलींचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेत त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण करून धर्मांतर केले जाणे, हे हिंदु धर्मावरील आक्रमण आहे. यातून हिंदूंनी शत्रूबोध घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. सातारा येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘कॉर्पोरेट जिहाद’विरोधी विशेष परिसंवादात ते बोलत होते. या वेळी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनीही मार्गदर्शन केले. ७०० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. शंखनाद करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सौ. भक्ती डाफळे यांनी केले. सामूहिक ‘वन्दे मातरम्’ म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि श्री. रमेश शिंदे यांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संस्था स्तरावर राबवण्यात येणार्या ‘बेटी सुरक्षित, तो राष्ट्र सुरक्षित !’ या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी ‘प्लाकार्ड’द्वारे अभियानाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
धर्मशिक्षणाविना हिंदूंचे अस्तित्व धोक्यात ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे. संकटामध्ये पैसा नाही, तर धर्मच रक्षण करतो. आज एकत्र कुटुंबपद्धत लयाला गेल्यामुळे ‘हिंदु’ उद्ध्वस्त झाला आहे. घराघरात ‘शुभंकरोति’ची जागा दूरचित्रवाणी मालिकांनी घेतली आहे. यामध्ये अनैतिकता, अश्लीलता बोकाळल्यामुळे हिंदु युवतींचे अध:पतन होऊन त्या ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकतात. आपण आपले सण, उत्सव, व्रतवैकल्ये केली नाहीत, तर ती पुढच्या पिढीला कसे कळणार ?
श्री. रमेश शिंदे म्हणाले,

१. अलफलाह विद्यापिठात शिक्षण घेणारे उच्चविद्याविभूषित धर्मांध मुसलमान हिंदूंना मारण्याचे षड्यंत्र रचतात; मात्र कॉर्पोरेट आस्थापनांमध्ये कार्यरत असणार्या हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’सारख्या प्रकारांना भुलतात.
२. हिंदु युवतींच्या माध्यमातून लोकसंख्या वाढवणे, भारत हिसकावून घेऊन त्याचे ‘खुरासान’ (संपूर्ण भारताचे इस्लामीकरण करणे) नामांतर करणे, हे धर्मांधांचे लक्ष्य आहे. धर्मांधांना हिंदूंचा ‘डी.एन्.ए.’च (डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक) बंद करायचा आहे. हिंदूंमध्ये सगोत्र विवाह करत नाहीत; मात्र धर्मांध सख्ख्या चुलत बहिणीशीही विवाह करतात. त्यामुळे विकृत पिढी जन्माला येत आहे.
३. ‘कॉर्पोरेट जिहाद्यां’ना ए.आय.एम्.आय.ए.चे (‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ म्हणजे ‘अखिल भारतीय मुसलमान एकता संघा’चे) संरक्षण आहे. त्यामुळे एम्.आय.एम्.वर बंदी घालण्यासाठी हिदूंनी संघटित झाले पाहिजे.
४. ‘कॉर्पोरेट जिहाद’सारख्या प्रकारात तेथील व्यवस्थापनाला दोषी धरण्यात यावे’, तसेच अशा आस्थापनांमध्ये सलग ३ वेळा अशी घटना घडली, तर आस्थापनाला सरकारकडून मिळणार्या सर्व सवलती बंद करण्यात याव्यात आणि ६ मासांसाठी त्यांची अनुज्ञप्ती निलंबित करावी, अशी मागणी समितीच्या वतीने आम्ही पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारकडे केली आहे.
उपस्थित मान्यवर
भाजप महिला मोर्चाच्या सातारा जिल्हाध्यक्षा सौ. तेजस्विनी घोरपडे, ‘मारसिया मेट्स’ आस्थापनाचे मालक श्री. मारुती शिंदे, शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश शेळके, विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनी प्रमुख सौ. अस्मिता लाड, अखिल भारत हिंदू महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता दत्तात्रय सणस, अधिवक्ता संजय शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. मनोज देशमुख, ह.भ.प. विजय महाराज लोणीकर, पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. धनंजय देशमुख, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सातारा जिल्हा संयोजक श्री. शिवाजीराव तुपे, प्रसिद्ध उद्योजक श्री. मोहन शिंदे, विश्व हिंदू परिषदेचे माजी शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर, फलटण तालुक्यातील नाईकबाबोंबवाडी येथील ‘तातमगिरी मठा’चे विश्वस्त
विशेष साहाय्य
सर्वश्री राजेंद्र घुले, सौरभ पोतेकर, अजय कदम, दत्ता भोसले, विशाल देशपांडे, स्वप्नील माने, प्रवीण कदम, वसंतशेठ जोशी, सौ. जयश्री शिंदे, सौ. माधुरी सोनवणे
कार्यक्रमानंतर वक्त्यांसमवेत झालेल्या शंकानिरसन बैठकीला स्थानिक नागरिक, युवक, युवती आणि महिला यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी सर्वांनी ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित !’ या समितीच्या अभियानामध्ये सहभागी होण्याचा निर्धार केला.
कल्याण येथे नालेसफाईसाठी बालकामगाराचा वापर; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंद
सातारा येथे व्यावसायिक लाभासाठी महामार्गावरील रस्ते दुभाजक फोडले
महामार्गांवरील फलकांवर ‘अहिल्यानगर’ आणि ‘छत्रपती संभाजीनगर’ नावे त्वरित लावावीत !
ईरोड (तमिळनाडू) येथील कस्तुरी रंगनाथ मंदिरात भावपूर्णरित्या पार पडला ‘महासुदर्शन याग’ !
तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक