महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन

मुंबई – रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील वलप ग्रामपंचायतीमध्ये तब्बल २ सहस्र ६६० बनावट जन्मनोंदी आढळल्या आहेत. फेब्रुवारी २०२६ मध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पनवेलमध्ये गुन्हे अन्वेषण शाखेकडून या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे. नागरी नोंदणी प्रणालीद्वारे जुन्या जन्मनोंदींचे ‘डिजीटलायझेशन’ करतांना हा प्रकार करण्यात आला आहे. २४ जून या दिवशी काही आमदारांनी याविषयीचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. या तारांकित प्रश्नाची सभागृहात चर्चा होऊ शकली नाही; परंतु ग्रामविकास विभागाकडून लेखी दिलेल्या उत्तरामध्ये वरील माहिती देण्यात आली आहे.
तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक
दाबोळी येथे दीड कोटी रुपये किमतीचे पेट्रोल कह्यात
मुंबईतील पूर्व समुद्रकिनार्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास !
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !