
नगर – आजच्या निर्णयक्षमता गमावलेल्या युवकांना भागवत ग्रंथ आधार वाटतो. १८ पुराण श्रवण केल्याचे पुण्य एकट्या भागवत कथेच्या श्रवणाने मिळते. भागवत कथा भवरोगावरची प्रभावी औषधी आहे. पशूहत्या-आत्महत्या करणार्यांना भागवत कथेत रूची रहाणार नाही. भगवंताने बुद्धी देऊन सर्वांना स्वतंत्रता दिली आहे. कोणत्या मार्गाने चालायचे ? हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. गीता-भागवताचे श्रवण केल्याने कल्याणच होते, असा मार्गदर्शन ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान् रेवतीनंदन दास यांनी केले. ते येथील नवीन टिळक रोडवरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भागवत कथा निरूपण सोहळ्याचे चतुर्थ पुष्प गुंफतांना बोलत होते.
इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक श्रीमान गिरीवरधारी दास यांनी अहिल्यानगर शहरासह देशभर चालू असलेल्या इस्कॉनच्या आंतरराष्ट्रीय कार्याची माहिती दिली. सर्वश्री वैष्णवतोष्णी दास, डॉ. सतीश फाटके, अशोक कानडे, मदन कांबळे, डॉ.सौ. अंजली फाटके, मगनभाई पटेल, राजूभाई पटेल, मदन थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा पुष्पवृष्टी करत साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीमान् रेवतीनंदन दास पुढे म्हणाले की, कलीयुग दोषांचा सागर आहे. मद्यपान, पशूहत्या, मांसाहार, व्याभिचार, जुगार येथेच कली रहातो. भांडणे आणि दांभिकता ही कलीची लक्षणे आहेत. नित्य-निरंतर कथा वाचन, कथा श्रवण, पूजा, जप करणार्यांवर कलीयुगाचा प्रभाव पडत नाही. भगवंताचे नाम आणि भगवंत यामध्ये काहीही अंतर नाही. नाम घेतांना भगवंताच्या उपस्थितीची अनुभूती येते. भगवंताचे नाम, भगवंताच्या लिला, भगवंताचे अवतार आपल्याला भगवंताकडेच नेतात.
आपण केलेल्या धर्मकार्याचा लाभ आपल्याला होतोच पण पुढील पिढ्यांनाही होतो. मुलगा भक्त झाला, तर २१ पिढ्यांचा उद्धार करतो पण मुलगी भक्त झाली तर ती ४२ पिढ्यांचा उद्धार करते, असे तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे. मुलगी साक्षात् लक्ष्मी असते. जो भक्तीपूर्वक भागवत कथेचे अमृतपान करतो त्याला मृत्यूचे भय रहात नाही. जे आई-वडील आपल्या मुला-मुलींना भगवंताची भक्ती करावी, हे सांगत नाहीत ते आई-वडील म्हणण्यास लायक नसतात. आज लेकरांना कार्टून दाखवा. ती पुढे कार्टूनच होतील, असे श्रीमान् रेवतीनंदन दास यांनी सांगितले.
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
सत्संगात नसलेल्यांची स्थिती भरकटलेल्या पतंगासारखीच – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
मोकाट कुत्र्यांना आवरा !