पावशी येथील मेहनील वाटवे यांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला !

कुडाळ – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवून अन्य प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण करणार्या २ चालकांवर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई ओसरगाव पथकर नाका येथे ट्रेलर (माल वाहून नेणारे वाहन) अडवून करण्यात आली. एका जागरूक नागरिकाच्या प्रसंगावधानामुळे आणि महामार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे महामार्गावरील एक मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना २६ जून या दिवशी घडली.
मुंबई-गोवा महामार्गावरून भरधाव वेगाने आणि अन्य वाहनांना हुलकावणी देऊन मागे टाकत २ ट्रेलर जात असल्याचे पावशी येथील ‘वाटवे क्रेन’चे मालक मेहनील वाटवे यांच्या निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने महामार्ग पोलीस विभाग, कसाल कार्यालय येथे संपर्क करून माहिती दिली. पोलीस पथकाने तात्काळ नाकेबंदी करून दोन्ही भरधाव ट्रेलर ओसरगाव पथकर नाक्यावर रोखले. या वेळी वाहनांचे चालक अतीमद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे चालक ब्रह्मदेव विष्णु घुले नाईक (घुलेवाडी, बीड) आणि चालक महादेव दशरथ तांबे (रहाणार नफरवाडी, बीड) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक
दाबोळी येथे दीड कोटी रुपये किमतीचे पेट्रोल कह्यात
मुंबईतील पूर्व समुद्रकिनार्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास !
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !
श्री कटमगाळदादा देवाकडे गार्हाणे घालून फर्मागुडी येथील प्रस्तावित ‘आयआयटी’ला काही जणांचा विरोध