गार्हाणे घालणारे नेते गावाबाहेरचे !
(आयआयटी – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – भारतीय तंत्रज्ञान संस्था)

फोंडा, २८ जून (वार्ता.) – फर्मागुडी येथील कायमस्वरूपी ‘आयआयटी’ प्रकल्प उभारण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. २८ जून या दिवशी शेकडो ग्रामस्थ आणि भाविक यांनी फर्मागुडी येथील जागृत अशा श्री कटमगाळदादा (क्षेत्रपाल देवता) देवस्थानात एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने प्रस्तावित ‘आयआयटी’च्या विरोधात गार्हाणे घातले. आयआयटी प्रकल्पाच्या उभारणीमुळे देवस्थानच्या पावित्र्याला आणि परिसराच्या धार्मिक वारशाला बाधा येऊ नये, अशी प्रार्थना करण्यात आली. या वेळी ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ पक्षाचे आमदार वीरेश बोरकर, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा उसगावकर, रामा काणकोणकर, शंकर पोळजी, नगरसेवक व्यंकटेश नाईक, गुरुदास नाईक, डॉ. स्वप्निल कारापूरकर आदींची उपस्थिती होती. (यांपैकी स्थानिक ग्रामस्थ किती होते ? हा प्रश्न आहे. यांना देवस्थानच्या पावित्र्याची काळजी आहे कि राजकारण करायचे आहे ? असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो ! देवाच्या स्थानाचा आधार घेऊन भाविक ग्रामस्थांच्या मनात संशय निर्माण करण्याचा हा प्रयत्न नाकारता येणार नाही ! – संपादक)
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या भूमी निवड समितीने फर्मागुडी येथे आयआयटी संकुल उभारणीस मान्यता दिली आणि ११ जून २०२६ या दिवशी गोवा सरकारला ‘आयआयटी’च्या उभारणीसाठी आवश्यक सर्व कृती करणे आणि भूमी लवकरात लवकर केंद्राकडे स्थानांतर करण्यास सांगितले होते. यानंतर गोवा सरकारने ५ लक्ष चौ.मी. सरकारी भूमी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला देण्यास संमती दिली होती. फर्मागुडी येथे कायमस्वरूपी ‘आयआयटी’ प्रकल्प उभाण्यास विरोध करणार्यांच्या मते या प्रकल्पामुळे देवस्थान परिसराचे पावित्र्य आणि धार्मिक वातावरण यांवर परिणाम होणार आहे. यामुळे ‘आयआयटी’ प्रकल्प येथे राबवू नये. देवस्थानचे रक्षण करण्यासाठी लोकशाही मार्गाने आवश्यक ते सर्व प्रयत्न चालू ठेवणार असल्याचा निर्धारही उपस्थितांनी आंदोलनाच्या वेळी केला.
आंदोलनाला कारापूरवासियांचाही पाठिंबा
फर्मागुडी येथील प्रस्तावित ‘आयआयटी’ प्रकल्पाला विरोध करण्यासाठी कारापूरवासियांनी उपस्थिती लावली होती. कारापूरवासीय कारापूर, सर्वण येथील लोढा प्रकल्पाला विरोध करत आहेत.
तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक
दाबोळी येथे दीड कोटी रुपये किमतीचे पेट्रोल कह्यात
मुंबईतील पूर्व समुद्रकिनार्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास !
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !