मुंबई – पूर्व समुद्रकिनारा आता सर्वसामान्यांसाठी एक नवीन पर्यटन आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकसित होत आहे. या पावसाळ्यात ऐतिहासिक बलार्ड इस्टेट येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल जनतेसाठी खुले करण्यात आले आहेत. जिथे एके काळी फक्त जहाजे ये-जा करत असत, तिथे आता मुंबईकरांना समुद्रकिनार्यावरील फेरफटका, खरेदी आणि मनोरंजन यांचा आनंद घेता येईल.
लवकरच येथे एक उद्यान विकसित केले जाईल. पावसाळ्यात क्रूझ जहाजे सेवेत नसल्यामुळे टर्मिनलचे २ मजले जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येथे येणारे पर्यटक खरेदी, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, पिकलबॉल, गो-कार्टिंग आणि मुलांसाठी असलेल्या विशेष खेळाचा आनंद घेऊ शकतात. समुद्रात नांगरलेल्या जहाजांचे दृश्य हे ही येथील एक प्रमुख आकर्षण आहे.

तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक
दाबोळी येथे दीड कोटी रुपये किमतीचे पेट्रोल कह्यात
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !
श्री कटमगाळदादा देवाकडे गार्हाणे घालून फर्मागुडी येथील प्रस्तावित ‘आयआयटी’ला काही जणांचा विरोध