उच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही कृषीभूमीविषयी प्रशासन उदासीन का ? – ग्रामस्थांचा प्रश्‍न

गत २५ वर्षे नवीन कुर्ली गावात सहस्रो लोक वास्तव्य करत आहेत. ग्रामपंचायत नसल्याने त्यांना शासकीय कामांसाठी लागणारे दाखले मिळत नाहीत. गावातील रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत आवश्यकतांसाठी शासनाकडून निधी मिळत नाही.

शत्रूराष्ट्रांचे नवीन युद्धतंत्र : आंदोलकांचा आतंकवाद !

सध्या ‘आंदोलकांचा आतंकवाद’ हा युद्धाचा नवीन प्रकार अधिक लोकप्रिय होत आहे. आंदोलन करण्याचा अधिकार घटनेने तो प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे; परंतु जेव्हा ते आंदोलन सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेला हानी पोचवते, तेव्हा ते अवैध असते.

युरोपीय संघाकडून भारताला नव्हे, तर पाकच्या बासमती तांदळाला ‘जीआय’ टॅग !

बासमती तांदळाचे मूळ भारतात आहे, असा दावा भारताने केला होता. हा तांदूळ हा भारत आणि पाकिस्तान दोन्हीकडे पिकतो, पाकच्या या दाव्याला मान्यता देत पाकला ‘बासमती’ तांदळाच्या जगप्रसिद्ध जातीचा ‘जीआय टॅग’ मिळाला आहे.

सिंघू सीमेवर स्थानिक नागरिक आणि आंदोलनकर्ते यांच्यात संघर्ष !

तलवारी, लाठीकाठ्या आदी साहित्य घेऊन आंदोलन करणारे आणि प्रसंगी पोलिसांवर आक्रमण करणार्‍या आंदोलनकर्त्यांना वठणीवर आणण्याचा आदेश सरकार पोलिसांना का देत नाही ?

मधमाशांचे पोळे बनवण्याच्या खोक्यांचे शेतकर्‍यांना वितरण

गोवा खादी आणि ग्रामीण उद्योग महामंडळाने उत्तर गोवा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थेच्या सहयोगाने एका विशेष सोहळ्याद्वारे जुने गोवे येथील कृषी क्षेत्रात सांताक्रूझचे आमदार आंतोनियो फर्नांडिस यांच्या हस्ते मधमाशांचे पोळे बनवण्याच्या १०० खोक्यांचे वितरण केले.

अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले !

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारी, म्हणजेच उद्यापासून शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसणार होते.

काँग्रेस नेते शशी थरूर, पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासहित अनेक पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद

पोलिसांच्या गोळीबारात शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवल्याचे प्रकरण : केवळ गुन्हा नोंदवून पोलिसांनी थांबू नये, तर अशांना कारागृहात डांबावे आणि जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !

देहली पोलिसांकडून शेतकरी नेत्यांच्या विरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी !

देहली पोलिसांकडून २० हून अधिक शेतकरी नेत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. यासह शेतकरी नेत्यांची पारपत्रे जप्त करण्याची कारवाईही चालू केली जाणार आहे.

देहलीत हिंसा करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !

देहलीच्या हिंसाचार प्रकरणी कृषी कायद्याला विरोध करणार्‍यांना पकडून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा, अशी मागणी रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

देहलीतील ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचारात ३०० पोलीस घायाळ !

पोलीस हिंसक जमावाकडून मार खातात, याचा अर्थ ‘हिंसाचार करणार्‍या जमावाला ताळ्यावर कसे आणायचे, याचे प्रशिक्षण पोलिसांना मिळत नाही’, असे समजायचे का ? जमावाकडून मार खाणारे पोलीस जनतेचे आतंकवाद्यांपासून रक्षण काय करणार ?