पुढील २ दिवसांमध्ये मंत्रीमंडळ खाते वाटप होईल ! – मंत्री गुलाबराव पाटील
महायुतीच्या ३ पक्षांत काही खात्यांवरून वाद आहेत. येत्या २ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र बसून चर्चा करतील.
महायुतीच्या ३ पक्षांत काही खात्यांवरून वाद आहेत. येत्या २ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र बसून चर्चा करतील.
‘संतांनी देहत्याग केल्यानंतरही त्यांचे कार्य सूक्ष्मातून चालूच असते’ हे लक्षात येते. संतांच्या कार्यानुरूप त्यांच्याकडून शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने प्रक्षेपित होत असतात.’
पुणे शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक बोलत असल्याचे सांगून बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यात ४ कोटी ६ लाख १७ सहस्र रुपये पाठवण्यास सांगून फसवणार्या महिला सायबर गुन्हेगाराला पोलिसांनी पकडले.
राज्यात अनेक ठिकाणी बोगस औषधांचा साठा सापडला. त्या विरोधात अधिवेशनाच्या सहाव्या आणि शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीने विधीमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन केले.
‘आर्.टी.ओ.’च्या दुर्लक्षामुळे वाहन पडताळणी नियमित होत नाही, हे गंभीर आहे. अशा कामचुकार अधिकार्यांना कठोर शिक्षा करायला हवी !
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे २२ डिसेंबर या दिवशी सातारा येथे आगमन होत आहे. यानिमित्ताने त्यांचे जिल्ह्यामध्ये भव्य स्वागत करण्यात येणार आहे.
नागपूर येथे १६ डिसेंबरपासून चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे २१ डिसेंबर या दिवशी सूप वाजले. पुढील अर्थसंकल्पीय म्हणजे उन्हाळी अधिवेशन ३ मार्चपासून मुंबई येथे असणार आहे.
पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासह जे प्रकल्प रखडले आहेत, जो मुंबईकर मुंबईतून बाहेर गेला आहे, त्याला पुन्हा मुंबई येथे घर देण्याचे काम ‘स्वयं-पुनर्विकास योजने’च्या माध्यमातून करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत दिली.
रायगडचे पालकमंत्रीपद आमच्या नशिबात असावे, असे मला वाटत आहे. कुठला विभाग मिळणार, हे आताच सांगू शकत नाही. माझ्या निवडीला तिन्ही पक्षांची हरकत नाही. तिन्ही नेत्यांनी बसून ठरवले आहे.
येथील सोसायटीमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाकडून त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.