छत्रपती संभाजीनगर येथे मुलांच्या साहाय्याने चालणारे बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त !

३५ सहस्र रुपयांच्या खर्‍या नोटांच्या मोबदल्यात १ लाख रुपयांच्या बनावट नोटा मेडिकल, तसेच किराणा दुकानांतून चलनात आणणार्‍या ७ जणांना अटक करण्यात आली.

विशाळगडावर शिवभक्तांकडून ‘मशाल महोत्सव’ उत्साहात साजरा  !

सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर ज्या पद्धतीने ‘मशाल महोत्सव’ साजरा होतो, त्याच धर्तीवर या वर्षीपासून कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी विशाळगड येथेही ‘मशाल महोत्सव’ चालू करण्यात आला.

ललित पाटील प्रकरणी चौकशी : समितीकडून राज्य सरकारकडे अहवाल सादर !

‘ससून रुग्णालया’तून अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील पसार झाल्याप्रकरणी चौकशी समितीची स्थापना केली होती.

मराठा आणि धनगर आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे !

दोन्ही समाजांना जातीच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सर्वांनाच प्रेरणादायी ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने वर्धा येथे नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

काळ्या पैशांवर आधारित पत्रकारितेच्या खांद्यावर नैतिकतेचा झेंडा, हा विनोदच ! – ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर

भाऊ तोरसेकर यांना ‘काकासाहेब पुरंदरे स्मृती’ पुरस्कार प्रदान

जालना येथे मराठा आरक्षणावरून तहसीलदारांची गाडी फोडली !

नांदेड आणि बीड जिल्ह्यांत बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व बसगाड्या सेवा रहित करण्यात आली आहे.

गोव्यात ग्रामसभांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

तालुक्यातील रिवण पंचायतीने २९ ऑक्टोबरला झालेल्या ग्रामसभेत सांगे येथील प्रस्तावित ‘आयआयटी’ प्रकल्पाला संमती देणारा ठराव एकमताने संमत केला.

मंत्री दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन यांचे दौरे रहित !

अहिल्यानगरमध्ये २९ ऑक्टोबर या दिवशी ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघा’च्या वतीने राज्यस्तरीय महामंडळ सदस्य त्रैवार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार होते

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणारच ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सर्वांनी धैर्य ठेवावे. तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. ते कणेरी मठ येथे पत्रकारांशी बोलत होते.