ललित पाटील प्रकरणी चौकशी : समितीकडून राज्य सरकारकडे अहवाल सादर !

पुणे – ‘ससून रुग्णालया’तून अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील पसार झाल्याप्रकरणी चौकशी समितीची स्थापना केली होती. या समितीने चौकशी करून वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे अहवाल सादर केला. निवतकर हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे पाठवणार आहेत; परंतु सचिव परदेश दौर्‍यावर गेले असल्याने हा अहवाल ३ नोव्हेंबर या दिवशी सादर केला जाणार आहे.

ललित पसार झाल्यानंतर राज्य सरकारने चौकशी समिती नेमली. समितीने रुग्णालयातील ८० जणांकडे विचारपूस करून अधिष्ठाता, वैद्यकीय अधिक्षक, उपअधीक्षकांचा लेखी जबाब, ‘ससून’मधील वर्ष २०२० पासून भरती असलेल्या बंदीवान रुग्णांच्या अहवालांची चौकशी करून अहवाल केला. समितीचे डॉ. म्हैसेकर म्हणाले की, अहवाल गोपनीय असल्याने त्याचा तपशील घोषित करता येणार नाही. राज्य सरकार अहवालावर कार्यवाही करेल.

संपादकीय भूमिका

आजपर्यंत अनेक चौकशी समित्यांचे अहवाल सरकारकडे प्राप्त झाले आहेत; परंतु ‘किती अहवालांवर कारवाई करण्यात आली ?’, असा प्रश्न जनतेला पडतो.  चौकशी समितींची फलनिष्पत्ती किती आहे, याचाही अभ्यास होणे आवश्यक !