‘श्रीकृष्णाची आरती हीच विठोबाची आरती’, असा विचार आल्यावर दोघेही एकमेकांपुढे दिसणे आणि ‘हा मनाचा खेळ असल्या’चा विचार आल्यावर विठोबाच्या ओठाला लोणी लागलेले दृश्य आरती पूर्ण होईपर्यंत दिसणे

पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई

‘आषाढ शुक्ल एकादशी, कलियुग वर्ष ५११२ (२१.७.२०१०) या दिवशी सकाळी मी देवाची पूजा करतांना देव्हारा पुसत होते. तेव्हा ‘आपण विठ्ठल मंदिर स्वच्छ करत आहोत’, असा विचार मनात आला. नंतर नेहमीप्रमाणे पूजा झाल्यावर आरती करू लागले. आरती चालू असतांना ‘विठोबाची आरती म्हणावी’, हा विचार आला. ‘ती न बघता म्हणता येईल कि नाही’, असे वाटले आणि लगेच ‘श्रीकृष्णाची आरती हीच विठोबाची  आरती’, असा विचार आला. कृष्णाची आरती चालू झाल्यावर विठोबा दिसला आणि त्याच्याच पुढे श्रीकृष्ण दिसला. मग मला हसू आले. ‘सर्व मनाचे खेळ आहेत’, असे मनात आले. तेव्हा लगेच विठोबाच्या ओठाला लोणी लागलेले दिसले आणि ते आरती पूर्ण होईपर्यंत होते. आरती पूर्ण झाल्यावर ते दृश्य संपले. मग सद्गुरूंची आरती झाल्यावर प.पू. डॉक्टरांना नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.’

– पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई, जागमाता, ठाणे.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक