साधनेचा प्रसार करण्‍यासाठी कठोर परिश्रम घेणारे आणि अद्वितीय संशोधनकार्य करणारे प.पू. डॉ. आठवले !

‘गोवा येथे स्‍थित सनातन संस्‍थेचे संस्‍थापक प.पू. डॉ. जयंत आठवले हे मानवी रूपातील दैवी अवतार आहेत. त्‍यांचे आपल्‍या मातृभूमीवर, म्‍हणजेच भारत देशावर निस्‍सीम प्रेम आहे. प.पू. डॉ. आठवले यांचे अध्‍यात्‍मप्रसार आणि धर्मरक्षण यांचे कार्य संपूर्ण जगभर पसरले आहे…

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या भव्य आणि व्यापक संकल्पनेवर कार्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !   

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची एक अत्यंत भव्य आणि व्यापक अशी कल्पना त्यांच्या मनामध्ये स्फुरण पावली अन् त्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी योग्य दिशेने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या हृदयांत ‘हिंदु राष्ट्र’ हे शब्द सोनेरी अक्षरांत कोरले !  – जी. राधाकृष्णन्, भाजप नेते, तमिळनाडू

हिंदुत्वाचे कार्य करतांना कितीही अडथळे आले, तरी त्यांना धैर्याने आणि सकारात्मकतेने तोंड देऊन त्यांवर मात करण्यासाठी परात्पर गुरुदेवांनीच आम्हाला सामर्थ्य दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या सहवासात अनुभवलेला अमृतधारांचा वर्षाव !

प.पू. गुरुदेव श्री आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) यांचा सत्संग अचानक घडल्यानंतर मला अनुभूतींची मालिकाच पुन्हा जगायला मिळाली. – श्री. गिरीश केमकर

देवतांच्या चित्रांतून शक्तीची स्पंदने प्रक्षेपित होऊ लागणे, म्हणजे ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी त्यांची तत्त्वे निर्गुण स्तरावरून सगुण स्तरावर येण्याचे प्रमाण वाढणे !

सनातनचे सद्गुरु, संत आणि साधक यांचे समष्टी प्रयत्न अपेक्षित असे झाल्यावर आता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अस्तित्वामुळेच देवतांची तत्त्वे प्रत्यक्ष कार्यरत होण्यास आरंभ झाला आहे आणि त्याची अनुभूती साधकांना आता येत आहे.

तेजस्वी आणि हालचाल करत असूनही ध्यानस्थ भासणारा ज्ञानसूर्य म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांना पहाताक्षणीच माझे हृदय बोलू लागले आणि माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. एक अखंड पावित्र्य माझ्यासमोर अवतरले होते.