गोरखपूर नगरपालिकेतील बहुतेक वॉर्डांची इस्लामी नावे पालटली !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – गोरखपूर नगरपालिकेने शहराच्या वॉर्डांच्या पुनर्रचनेला संमती दिली आहे. यानुसार आता ३२ नव्या गावांना पालिकेत समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच ४० वॉर्डांची नावे पालटण्यात आली आहेत. यात बहुतेक इस्लामी नावे पालटण्यात आली असून त्या ठिकाणी महापुरुष आणि वीरगतीला प्राप्त झालेल्या क्रांतीकारकांची नावे देण्यात आली आहेत. यात पंडित मदन मोहन मालवीय, भगतसिंह, राम प्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, फिराक गोरखपुरी, दिग्विजयनाथ, मत्स्येंन्द्र नाथ आदींचा समावेश आहे. आता यावर जनतेकडून हरकती मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर याला अंतिम संमती दिली जाणार आहे.

संपादकीय भुमिका

असा निर्णय देशातील प्रत्येक पंचायत, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, राज्य सरकार आदींनी घेतला पाहिजे !