१. शिबिराच्या आरंभी प्रार्थना केल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीकृष्णाच्या रूपात सभागृहात उपस्थित आहेत’, असे सूक्ष्मातून दिसणे
‘१७.६.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात साधनेविषयी शिबिर आयोजित केले होते. तेव्हा मी आरंभी प्रार्थना करून नमस्कार केला. तेव्हा मला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीकृष्णाच्या रूपात सभागृहात उपस्थित आहेत’, असे दृश्य सूक्ष्मातून दिसले आणि ‘माझ्या मनातील सकारात्मकता टिकून राहू दे. मला शिकण्याच्या स्थितीत रहाता येऊ दे’, अशा प्रार्थना माझ्याकडून शिबिराच्या पहिल्या दिवसापासून आपोआप चालू झाल्या.
२. शिबिरात एकरूप होण्याचा प्रयत्न केल्यावर शिबिरात चालू असलेला विषय अंतर्मनापर्यंत पोचणे
शिबिरात येण्यापूर्वी माझ्याकडून स्वतःच्या कोषात रहाण्याचा आणि एका चौकटीत रहाण्याचा भाग होत होता; परंतु इथे आल्यापासून या कोषातून बाहेर पडण्यासाठी माझे प्रयत्न चालू झाले. त्यासाठी प्रार्थना केल्यामुळे ‘मी प्रत्येक क्षणी शिबिरात एकरूप होत आहे’, असे मला वाटत होते. त्यामुळे शिबिरात चालू असलेला विषय अंतर्मनापर्यंत पोचू लागला.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी आलेली अनुभूती
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ शिबिरात स्वभावदोषांवर मार्गदर्शन करत होत्या. ‘तेव्हा सभागृहात प्रकाश वाढला आहे’, असे मला जाणवले आणि माझ्यातील उत्साह अन् आनंद वाढून मनात शरणागतभावाची स्थिती निर्माण झाली.
४. शिबिरात ‘संतांविषयी भाव कसा असावा ?’ हा विषय चालू असतांना सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या आवाजात ‘गुरु की सेवा’ या गाण्याची धून ऐकू येणे आणि भावजागृती होणे
शिबिरात ‘संतांविषयी भाव कसा असावा ?’ हा विषय चालू असतांना अचानक सभागृहात सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांच्या आवाजात ‘गुरु की सेवा’ या गाण्याची धून ऐकू आली. तेव्हा वातावरणात शीतलता जाणवत होती आणि त्याच वेळी बासरीचे सूरही स्पष्टपणे ऐकू येत होते. तेव्हा माझा भाव जागृत झाला.’
– डॉ. (सौ.) साधना जरळी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (१८.६.२०१९)
|