रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून अधिवक्त्यांनी दिलेले अभिप्राय !

१. अधिवक्ता नटराज जी. एम्., बेंगळुरू, कर्नाटक

आश्रम पहाणे, ही एक आध्यात्मिक अनुभूतीच आहे ! : आश्रम पहाणे, ही माझ्यासाठी एक आध्यात्मिक अनुभूतीच आहे. आश्रमात मला देव आणि दैवी शक्ती यांचे अस्तित्व जाणवले. येथील साधकांमध्ये असलेली शिस्त, प्रेमभाव, स्वच्छता आणि ज्ञान हे माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक होते. ‘मानसपूजा’ चालू असतांना मला पुष्कळ चांगली अनुभूती आली.

सूक्ष्म जगताच्या प्रदर्शनाविषयी : सूक्ष्म जगताच्या संदर्भातील प्रदर्शन चांगल्या प्रकारे मांडले आहे. त्यामुळे वाईट शक्तींचे आक्रमण आणि त्यामागील शास्त्र सहज समजून येते. येथे शिकण्यासारखे पुष्कळ आहे. (२६.१२.२०१९)

२. अधिवक्ता प्रसन्ना डी.पी., बेंगळुरू

आश्रमातील सकारात्मक स्पंदनांमुळे सात्त्विक लोक आश्रमाकडे आकर्षिले जातात ! : समाजात केवळ सामाजिक कार्य चालू असते. याउलट आश्रमामध्ये आध्यात्मिक कार्य चालू आहे. आश्रमातील सकारात्मक स्पंदनांमुळे सात्त्विक लोक येथे आकर्षिले जातात. येथील शिस्त, स्वच्छता आणि वातावरण चांगले आहे. येथील साधक साधनारत आहेत आणि त्याचा परिणाम इतरांवरही होतो. (२६.१२.२०१९)

३. अधिवक्ता गंगाधर डी.सी., बेंगळुरू

आश्रम पाहिल्यावर मी या आश्रमाकडे आध्यात्मिकदृष्ट्या आकर्षित झालो ! : आश्रमात येताक्षणी मला पुष्कळ चांगले वाटले. येथील साधक आश्रमाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे पहातात. प्रत्येक मिनिटाचे नियोजन केलेले असते. येथील स्वच्छता चांगली आहे. आश्रम पाहिल्यावर मी या आश्रमाकडे आध्यात्मिकदृष्ट्या आकर्षित झालो. (२६.१२.२०१९)

४. अधिवक्ता सिद्धारूढ जिद्दीमणी, बेळगाव, कर्नाटक.

आश्रम म्हणजे मंदिर आहे ! : मला हा आश्रम स्वर्गाप्रमाणे वाटला. ‘हे एक मंदिर आहे’, असेही मला वाटले. येथे मला पुष्कळ शांत वाटले आणि ‘ध्यानासाठी बसावे’, असे वाटले. एकंदरीत आश्रम एक शांत आणि आनंदी ठिकाण आहे. (२७.१२.२०१९)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक