ध्येयाच्या ध्यासाने वेडी झाली गुरुदेवांची वैभवी (टीप १) ।
गुरुभक्ती करण्या ती सतत धडपड करी ।। १ ।।
राहून कार्यरत प्रत्येक क्षणी ।
गुरुसेवेचा विचार असे सदैव तिच्या मनी ।। २ ।।
कधी लहान होऊन आनंद देते ।
तर कधी साधनेतील मार्गदर्शक होते ।। ३ ।।
लहान-थोरांच्या असे जवळ ती ।
कारण मनी असे तिच्या निखळ प्रीती ।। ४ ।।
सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांची आहे ती सावली ।
सर्वस्व तिचे आहे गुरुमाऊली ।। ५ ।।
खूप कृतज्ञ आहे मी गुरुदेवा तुमच्या चरणी ।
माझी पात्रता नसतांनाही तुम्ही दिली मला ही सखी या जीवनी ।। ६ ।।
देवा, तिच्यासारखी तळमळ माझ्यातही निर्माण होऊ दे ।
तिच्या रूपाने दिलेल्या ठेव्याचा लाभ करून घेता येऊ दे ।। ७ ।।
गुरुदेवांची वैभवी लवकर पोचावी समष्टी संतपदी ।
हीच प्रार्थना आमची असे गुरुचरणी ।। ८ ।।
(टीप १ – कु. वैभवी भोवर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के))
– सायली जाधव, भोर, पुणे. (९.१.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |