स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदाची निवडणूक !
मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि लोकमान्य टिळक यांचे नातू, तसेच लोकमान्य टिळक स्मारकाचे अध्यक्ष दीपक टिळक यांनी उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला आहे. २६ डिसेंबर या दिवशी होणार्या स्मारकाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये अध्यक्षपदाची निवड होणार आहे. (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी प्रवीण दीक्षित यांचे नाव अध्यक्षपदासाठी सूचित केले असून त्याला स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे अभ्यासक चंद्रशेखर साने यांनी अनुमोदन दिले आहे.
सावरकरप्रेमी समविचारी मंडळींचा एक दबावगट निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल ! – प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य
स्वातंत्र्यवीर सावरकरांची अपकीर्ती करणार्या ‘एबीपी माझा’ आणि ‘द वीक’ या माध्यमांना सार्वजनिकरित्या क्षमायाचना करण्यास स्मारकाने भाग पाडले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती करणार्यांच्या विरोधात स्मारक तर लढा देईलच; पण अशा घटना रोखण्यासाठी भविष्यात समविचारी मंडळींचा एक दबावगट निर्माण करण्याचाही स्मारकाचा प्रयत्न असेल. तरुणाईपर्यंत सावरकर विचार पोचवण्यासाठी आधुनिक माध्यमांचा पुरेपूर वापर करणे, सावरकर साहित्य नव्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढे आणणे आणि येत्या काळात स्मारकाच्या शाखा देशभरात अन् जागतिक पातळीवर चालू करणे, मार्सेलिस येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला मूर्त रूप देणे, असे अनेक उपक्रम येणार्या काळात आखण्यात आले आहेत. येणार्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यशाची नवी शिखरे पादाक्रांत करेल. मागील १५ वर्षांत स्मारक एका वेगळ्या उंचीवर पोचले आहे.’’
स्मारकाचे उल्लेखनीय कार्य !
१. पुरातत्व विभागाच्या दत्तक योजनेच्या अंतर्गत भगूरमधील सावरकर वाड्याच्या देखभालीचा सन्मान स्मारकाला प्राप्त झाला.
२. ‘जेएन्यू’ या डाव्या विचारसरणीच्या विद्यापिठात ‘मृत्युंजय’ या नाटकाचे दोन प्रयोग झाले.
३. हिमाचल प्रदेशातील एका शिखराचे ‘शिखर सावरकर’ नामकरण केले.
४. गिर्यारोहण क्षेत्रासाठी ३ ‘शिखर सावरकर पुरस्कार’ चालू केले.
या स्मारकाच्या उल्लेखनीय कामाची माहिती श्री. प्रवीण दीक्षित यांनी दिली.
कोरोना काळातील सामाजिक योगदान !‘सावरकर स्मारकाने ३० पेक्षा अधिक उपक्रम केले. ५० हून अधिक कर्मचारी स्मारकाच्या ठिकाणी कार्यरत आहेत. कोरोनाच्या वैश्विक महामारीत स्मारकापुढेही आर्थिक अडचण होती, तरीसुद्धा स्मारकाने सर्व कर्मचार्यांना पूर्ण वेतन दिले. सामाजिक जाणिवेतून ५०० ‘पीपीई किट्स’, तसेच पोलीस आणि महानगरपालिका यांसाठी १० सहस्र सहस्र ‘मास्क’ पुरवले’, अशी माहिती श्री. दीक्षित यांनी दिली. |