चिंचवड (जिल्हा पुणे) येथे श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या ४६० व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन !

चिंचवड (जिल्हा पुणे) – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या ४६० व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन येथे करण्यात आले आहे. मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वितीया म्हणजे २१ डिसेंबर ते मार्गशीर्ष कृष्ण पक्ष षष्ठी म्हणजेच २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत हा सोहळा होईल. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थ यांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक, वैचारिक प्रबोधनपर व्याख्याने तसेच आरोग्य शिबिर यांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून ५० टक्के नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होईल, अशी माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे उद्घाटन कोल्हापूर करवीरपीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह स्वामी यांच्या हस्ते २१ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे. २३ डिसेंबरला ज्येष्ठ इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे यांचे ‘हिंदवी स्वराज्याचे धार्मिक धोरण आणि श्री देव दर्शन’ या विषयावर व्याख्यान होईल.