(म्हणे) ‘महिलांच्या सुरक्षेसाठी ‘डॉन्स बार’ला अधिकृत मान्यता देण्यासाठी कायदा करा !’  कळंगुट येथील पोलीस निरीक्षकाची मागणी

महिलांच्या सुरक्षेच्या नावाखाली महिलांचा सहभाग असलेले ‘अनधिकृत डान्स बार’ अधिकृत करण्याची शिफारस, ही ‘रोगाहून इलाज भयंकर’ अशी नाही का ?

नगर येथे धर्मपरिवर्तनाच्या उद्देशाने लावण्यात आलेल्या विज्ञापनाच्या विरोधात परभणी अधिवक्ता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

विज्ञापन पूर्णपणे अवैध असल्यामुळे त्यावर प्रतिबंध लावणे आवश्यक आहे, त्याकरिता योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदन ‘परभणी अधिवक्ता संघटने’च्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश वडदकर यांना ३० नोव्हेंबर या दिवशी देण्यात आले.

अमरावतीत हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा प्रयत्न ! – किरीट सोमय्या, भाजप

किरीट सोमय्या पुढे म्हणाले, ‘‘१२ नोव्हेंबरला एकाच दिवशी ३ मिरवणुका निघाल्या. या मिरवणुकांना कुणी अनुमती दिली ? याचे अन्वेषण झाले पाहिजे. त्रिपुरात मशीद पेटवल्याच्या अफवेचा सरकार शोध का घेत नाही ?

संत ज्ञानेश्वर माऊलींचे विचार शाश्वत असून मानवकल्याणासाठी आवश्यक ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

अधिवेशनाला सामोरे जाण्यास सरकारची सिद्धता नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

२९ नोव्हेंबर या दिवशी विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना फडणवीस यांनी हे वक्तव्य केले.

कर्नाटकातून महाराष्ट्रात येणार्‍यांची कर्नाटक सीमेवर पडताळणी होणार ! – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

आता कर्नाटकातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करतांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस घेतलेले प्रमाणपत्र किंवा ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक असणार आहे.

कोकणासह मध्य महाराष्ट्रात वादळी वार्‍यासह जोरदार पावसाची शक्यता

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील शेतकर्‍यांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

सुरत-हैदराबाद एक्सप्रेस महामार्गासाठी भूमींचे बाजारभावाप्रमाणे मूल्य न दिल्यास उपोषण करणार !

प्रकल्पबाधित शेतकर्‍यांची चेतावणी

शेतकरीहित कि देशद्रोह ?

एका वाहिनीने म्हटल्याप्रमाणे ‘हे आंदोलन कृषीकायद्यांच्या विरोधातील नाही, तर देशाच्या विरोधातील आहे.’ आंदोलकांची आंदोलन बंद न करण्याची भूमिका पहाता, तेच खरे असल्याचे सिद्ध होत आहे !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘ऑनलाईन’ जुगारावर आळा घालून भावी पिढी उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा ! – मनसेची सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांकडे मागणी

जुगाराचे दुष्परिणाम लक्षात आणून देऊन त्यावर बंदी घालण्याची मागणी पोलिसांकडे का करावी लागते ? सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांना जिल्ह्यात चालू असलेला जुगार लक्षात येत नाही कि जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे ?