अमरावतीत हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा प्रयत्न ! – किरीट सोमय्या, भाजप

किरीट सोमय्या

अमरावती – अमरावती हिंसाचारानंतर काँग्रेस गप्प का आहे ? अमरावतीत हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. १२ नोव्हेंबरला सहस्रो लोक रस्त्यावर येऊच शकत नाहीत. पोलिसांना तसे होऊ देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळे मी बाहेर काढत असल्याने माझ्या अमरावतीत येण्यावर प्रतिबंध लावण्यात आले होते. तरीही मी आता अमरावतीत काय घडले ?, याचा पाठपुरावा करण्यासाठी आलो आहे. आघाडी सरकार पुन्हा वर्ष ९२-९३ मध्ये झालेल्या दंगलीची पुनरावृत्ती करण्याचे षड्यंत्र आखत आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.

किरीट सोमय्या पुढे म्हणाले, ‘‘१२ नोव्हेंबरला एकाच दिवशी ३ मिरवणुका निघाल्या. या मिरवणुकांना कुणी अनुमती दिली ? याचे अन्वेषण झाले पाहिजे. त्रिपुरात मशीद पेटवल्याच्या अफवेचा सरकार शोध का घेत नाही ? वर्ष १९९२-९३ मध्ये शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वात हिंदूंना वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर होतो; मात्र त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्रीपदासाठी जर समझोता करत असतील, तर आम्ही ते चालू देणार नाही. महाराष्ट्रात हिंदूंवर आक्रमण झाले, तर त्याचे दायित्व आघाडी सरकारवर असेल. आतापर्यंत मी सरकारमधील २८ घोटाळे उघडकीस आणले असून ३१ डिसेंबरपर्यंत मी ४० घोटाळे उघडकीस आणणार आहे.’’