व्यवस्थापनाने शासकीय आदेश दुर्लक्षिल्यामुळे उच्च न्यायालयात याचिका ! – याचिकाकर्त्यांची माहिती

कर्मचार्‍यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा मालवण तालुका खरेदी-विक्री संघाला आदेश

साहित्य संमेलन कि धर्मद्रोह्यांचा अड्डा ?

साहित्यिक, मराठीप्रेमी यांचे दायित्व वाढले असून संमेलनाच्या व्यासपिठाचा उपयोग धर्मविरोधकांच्या उदात्तीकरणासाठी करणारे संयोजक-आयोजन यांना खडसावून असे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कंबर कसण्याची वेळ आली आहे.

२१ वर्षे दुर्लक्षित असलेल्या घोडमाळ (जिल्हा पालघर) येथील रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी !

रस्ता कच्चा असल्यामुळे वाहनेसुद्धा गावात येण्यास त्रास होत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना, गरोदर महिलांना, लहान मुलांना पुष्कळ त्रास होत आहे.

संभाजीनगर येथे लस न घेतलेले कर्मचारी आढळल्यास संबंधित संस्थेला ५० सहस्र रुपयांचा दंड ! – सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी

‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका ओळखून जिल्हाधिकार्‍यांनी काळजीच्या सूचना दिल्या आहेत, तसेच २० दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती कळवण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मराठा आरक्षणाची भीक नको, आमच्या बौद्धिक क्षमतेवर यश खेचून आणू ! – नानासाहेब पाटील, माजी अतिरिक्त मुख्य सचिव

नानासाहेब पाटील पुढे म्हणाले की, सध्या शेती अनेक संकटातून जात आहे. आगामी काळात ती उदरनिर्वाहाचे साधन होणार नाही. विहिर काढण्यासाठी कर्ज घेऊ नका, तर मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घ्या.

कामावर रुजू होऊ इच्छिणार्‍या कर्मचार्‍यांना अडवू नका, अन्यथा गुन्हे नोंद करणार ! – भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक

पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी सातारा बस स्थानकाला भेट दिली. या वेळी निंबाळकर यांनी आंदोलनकर्त्या अधिकारी आणि कर्मचारी यांना कामावर रुजू होऊ इच्छिणार्‍या कर्मचार्‍यांना अटकाव न करण्याच्या सूचना दिल्या.

विनामास्क ग्राहकांमुळे होणार्‍या दंडाविषयी व्यापार्‍यांची आंदोलनाची चेतावणी !

कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीच्या पार्श्वभूमीवर ‘सर्वांनी मास्क घालणे’, हे सर्वांचे सामाजिक दायित्व आहे, असे व्यापार्‍यांना वाटत नाही का ?

बिहार सरकारचा मंदिरांच्या संपत्तीवर दरोडा घालण्याचा प्रकार जाणा !

‘बिहार राज्य धार्मिक न्यास मंडळा’कडे नोंदणीकृत किंवा संलग्न असलेले मठ आणि मंदिरे यांची ३० सहस्र एकर भूमी ‘सार्वजनिक मालमत्ता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय बिहार सरकारने नुकताच घेतला.

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र प्रसार अभियानास उत्तम प्रतिसाद !

श्री. सुनील घनवट यांचा १९ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत मुंबई जिल्ह्यात संपर्क दौरा झाला. श्री. घनवट यांनी सनातनच्या ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’विषयीही माहिती सांगितली. त्याला सर्वांनीच चांगला प्रतिसाद दिला. त्याचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत.

सण, उत्सव, मंदिरे आणि परंपरा जिवंत ठेवण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

सध्या तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता मिळवली, तेव्हा लोक विमानाला लटकून तेथून पलायन करत होते. ही स्थिती आपल्यावर आणायची नसेल, तर हिंदु राष्ट्राची मागणी करायला हवी.