५६ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दहिसर (मुंबई) येथील कु. मयुरी तारी (वय ९ वर्षे)

(‘वर्ष २०१५ मध्ये कु. मयुरी तारी हिची आध्यात्मिक पातळी ५६ टक्के होती.’ – संकलक) 

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. मयुरी तारी ही एक आहे !

कु. मयुरी तारी

१. सुस्वभावी आणि मनमिळाऊ

‘मयुरी सुस्वभावी आणि मनमिळाऊ आहे. बस किंवा रेल्वेने प्रवास करतांना ती पुढील आणि मागील बाकावरील अनोळखी प्रवासी लोकांशी स्मितहास्य करून त्यांच्याशी संवाद साधायची. तिच्या गळ्यातील परात्पर गुरु डॉक्टर आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या पदकाला पाहून लोक तिला विचारायचे, ‘‘हे कोण आहेत ?’’ त्या वेळी ती त्यांना तिच्या बोली भाषेत सांगायची, ‘हे आमचे गुरुदेव आहेत आणि हे गुरुदेवांचे गुरुदेव आहेत. त्यांनी आम्हाला हा नामजप करायला सांगितला आहे’, असे सांगून तिला जेवढी साधना ठाऊक आहे, तेवढी ती त्यांना सांगायची.

२. आश्रमात रहाण्याची आवड

​पनवेलला माझी आई रहाते. शाळेला सुट्टी पडल्यावर ‘आपण पनवेलला जाऊया’, असा ती हट्ट करायची. तिला देवद आश्रमात आरतीला जायला आणि सेवा करायला आवडते. तसेच तिला तिथल्या बालसाधकांसह खेळायला आवडते.

३. साधनेविषयी इतरांना सांगणे

पनवेलला माझ्या भावाची ५ वर्षांची मुलगी आहे. तिची आई स्वामी समर्थांची उपासना करते. त्यामुळे मैत्रेयीला (भाचीला) त्या उपासनेविषयी माहिती आहे. मयुरी आणि मैत्रेयी एकत्र येतात, तेव्हा त्या दोघी करत असलेल्या उपासनेविषयी एकमेकींना सांगतात.

४. आज्ञापालन

​मयुरी स्वभावाने शांत आहे. ती वडीलधार्‍या व्यक्तींनी सांगितलेले पटकन ऐकते.

५. प्रेमभाव

​ती आपल्यापेक्षा लहान मुलांचे लाड करते आणि त्यांची काळजी घेते. त्यामुळे लहान मुलांना ती पुष्कळ आवडते.

६. जिज्ञासा

देवतांविषयी तिला आवड आणि जिज्ञासा आहे. तिला धार्मिक आणि पौराणिक कार्यक्रम बघायला आवडतात. त्या संदर्भात तिला अनेक प्रश्‍न असतात. कार्यक्रम पाहिल्यावर रात्री ती मला तिच्या शंका आणि प्रश्‍न विचारते.

७. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेप्रती गांभीर्य असणे

मयुरी स्वतःच्या अहंविषयी जागरूक असते. ‘तिच्यातील अहं कसा न्यून होईल ?’, यासाठी तिची धडपड असते. तिला कुणाचा राग आला, तर ती तो अधिक वेळ मनात ठेवत नाही. ‘राग हा षड्र्िपू आहे. तो अधिक वेळ आपल्यात राहिला, तर वाईट शक्ती आपल्यावर नियंत्रण मिळवते आणि आपल्याकडून वाईट कर्म करवून घेते’, असे ती मला सांगते. तिला कुणाचा राग आला किंवा वाईट वाटून रडू आले, तर ती त्याविषयी देवाला सांगते आणि काही वेळानंतर त्या अवस्थेमधून बाहेर पडते. तेव्हा ‘जणूकाही विशेष झाले नाही’, अशा प्रकारे वागते. ‘भोवतालच्या व्यक्तींच्या (लहान-मोठ्या) वागण्यावरून त्या व्यक्तींमध्ये किती अहं आहे’, हे तिला जाणवते. त्याविषयी ती माझ्याशी चर्चाही करते.

८. स्वभावदोष आणि अहं

​आळस, वेळेचे गांभीर्य नसणे, भित्रेपणा, स्वतःला न्यून लेखणे आणि तुलना करणे.’

– सौ. माधवी तारी, दहिसर, मुंबई. (कु. मयुरीची आई)

(१२.६.२०२०)

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या ! ​

‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ.
आठवले

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.