समष्टी साधनेची तळमळ असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे रत्नागिरी येथील श्री. महेंद्र चाळके !

६.१०.२०२० या दिवशी लोटे, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी येथील साधक श्री. महेंद्र चाळके यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यांनी साधनेसाठी केलेले प्रयत्न, तसेच साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहे.

श्री. महेंद्र चाळके

१. वक्तशीरपणा

‘श्री. महेंद्र चाळके सत्संग वेळेत चालू होण्यासाठी प्रयत्नरत असतात. आरंभी क्षमायाचना करून सर्वांमध्ये अंतर्मुखता निर्माण करतात.

२. अभ्यासू वृत्ती

पूर्वी दादांना सेवेचे चिंतन करायला सांगितल्यावर ताण यायचा; परंतु आता ते प्रत्येक गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करतात आणि सूत्रे सांगतात. त्यांनी सांगितलेली सूत्रे देवाला अपेक्षित आणि आवडतील, अशीच असतात.

३. स्वभावदोष जाण्यासाठी केलेले प्रयत्न

३ अ. ‘मनाने करणे’ हा स्वभावदोष जाण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करणे : पूर्वी दादांमध्ये ‘मनाने करणे’ हा स्वभावदोष होता. त्यांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांनी या स्वभावदोषाची जाणीव करून दिली. तेव्हापासून ते अंतर्मुख झाले आणि त्यांनी चिकाटीने या स्वभावदोषावर मात केली. आता ते प्रत्येक कृती विचारून करतात.

३ आ. उतावळेपणाने आणि भरभर बोलणे यांवर मात करून शांत अन् नम्रपणे बोलणे : पूर्वी त्यांच्यात ‘उतावळेपणाने आणि भरभर बोलणे’, हेे स्वभावदोष होते. या काही मासांत त्यांनी चिकाटीने प्रयत्न करून या स्वभावदोषांवर मात केली आहे. दादांना सतत साधकांचे किंवा समाजातील जिज्ञासूंचे दूरभाष येतात. त्या वेळी ते गुरुदेवांचे स्मरण करून शांतपणे दूरभाष उचलतात आणि शांत अन् नम्र आवाजात बोलतात.

सौ. साधना जरळी

४. तत्त्वनिष्ठ

काही वेळा दादांना साधकांकडून तक्रारीचा सूर ऐकावा लागला, तरी ते भावनाशील होत नाहीत, तर कार्यपद्धत पाळण्याचे महत्त्व पटवून देतात. गुरुदेवांनी सांगितलेल्या कार्यपद्धतींचा अवलंब ते घरात आणि अन्यत्रही करतात.

५. समष्टी साधनेची तळमळ

अ. महेंद्रदादांमध्ये समष्टी कार्याची पुष्कळ तळमळ आहे. त्यामुळे त्यांना लगेच विज्ञापने मिळतात, तपोधामसाठी अर्पण किंवा खाऊ मिळतो, तसेच बांधकामासाठी लागणार्‍या विविध वस्तूही तात्काळ अर्पण स्वरूपात मिळतात.

आ. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली किंवा सेवा करतांना कितीही अडथळे आले, तरी ते नेहमी सकारात्मक रहातात. ‘साधक सकारात्मक रहावेत आणि त्यांना योग्य दिशा मिळावी’, यासाठी ते प्रयत्नशील असतात. ते उत्साहाने, सतत सकारात्मक आणि देवाच्या अनुसंधानात राहून सेवा करतात.

६. भाव

ते सत्संगात बोलत असतांना साधकांना ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते. त्यांचे बोलणे अंतर्मनापर्यंत जाते. त्यांचा भावप्रयोग ‘अंतर्मनात भाव निर्माण करत आहे’, असे जाणवते.

‘ईश्वरा, ज्या गुणांमुळे महेंद्रदादा जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त होऊन तुझ्या चरणी समर्पित झाले, ते गुण आमच्यात लवकर येऊ देत आणि आम्हाला त्यांच्याकडून शिकता येऊ दे. आम्हाला गुरुमाऊलींच्या चरणी लवकर समर्पित होता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना करते.’

– आधुनिक वैद्या (सौ.) साधना जरळी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (१४.१०.२०२०)