असे नेते देशाचे भले करतील ?
‘बहुतेक राजकीय पक्षांचे काही कार्यकर्तेच नाही, तर काही नेतेही पगारी नोकराप्रमाणे असतात. दुसर्या पक्षाने अधिक पैसे दिल्यास ते त्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते होतात ! असे कार्यकर्ते आणि नेते देशाचे भले करू शकतील का ?’
‘बहुतेक राजकीय पक्षांचे काही कार्यकर्तेच नाही, तर काही नेतेही पगारी नोकराप्रमाणे असतात. दुसर्या पक्षाने अधिक पैसे दिल्यास ते त्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते होतात ! असे कार्यकर्ते आणि नेते देशाचे भले करू शकतील का ?’
‘अध्यात्मातील ‘प्रारब्ध’या शब्दाकडे आणि ईश्वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !’
‘हिंदु’ शब्दाची व्युत्पत्ती आहे, ‘हीनान् गुणान् दूषयति इति हिंदुः।’ म्हणजे ‘हीन, कनिष्ठ अशा रज आणि तम गुणांचा नाश करणारा.’ किती हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांच्या कार्यकर्त्यांना हे शिकवतात ?’
‘राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वार्थासाठी त्यांच्या पक्षाचे सरकार हवे असते, तर साधकांना ‘सर्वांचे चांगले व्हावे’, यासाठी ईश्वरी (धर्म) राज्य हवे असते.’
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना . . . छोट्यातील छोटा एकपेशीय प्राणीच काय; पण बाह्य गोष्टींच्या वापराशिवाय दगडाचा एक कणही बनवता येत नाही. याउलट ईश्वराने लाखो पेशी असलेला मानव आणि अनंत कोटी ब्रह्मांडे बनवली आहेत.’
आतंकवादी शक्ती देहलीपासून गल्लीपर्यंत दंगलींच्या माध्यमातून एकप्रकारे सीमा ओलांडून हिंदूंचा पराभव करत आहेत. हिंदूंनो, विजयादशमी का साजरी करायची असते ? किंवा अपराजितापूजन आणि शस्त्रपूजन का केले जाते ? याचा धर्मबोध घ्या.
‘जगातील . . . फक्त अध्यात्म हा एकच विषय विश्वातील सर्व विषयांशी संबंधित त्रिगुण, पंचमहाभूते, तसेच शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती इत्यादींच्या संदर्भात परिपूर्ण माहिती देऊ शकतो.’
‘आता बऱ्याच व्यवहारांच्या एकूण खर्चात अधिकृत खर्चासह ‘लाच देण्यासाठी किती खर्च होईल ?’, हेही लक्षात घेतात !’
‘तिसर्या महायुद्धातील भीषण काळात केवळ देवच वाचवू शकेल; म्हणून तरी देवाचे भक्त व्हा !’
‘हिंदु राष्ट्रातील सर्व कायदे धर्माधिष्ठित असतील. त्यामुळे त्यांच्यात पालट करावा लागणार नाही आणि त्यांच्या पालनाने गुन्हे न होता साधनाही होईल.’