आधुनिक शिक्षण आणि ईश्‍वरी ज्ञान यांतील अंतर !

‘आधुनिक शिक्षणात फारतर एका विषयात पदव्युत्तर शिक्षण घेता येते. अध्यात्मात ईश्‍वराकडून ज्ञान मिळवता यायला लागले की, सर्वच विषयांतील सर्व ज्ञान प्राप्त होऊ शकते !

एकमेवाद्वितीय संत !

‘गुंड धमकावून आणि राजकारणी भ्रष्टाचार करून पैसे लुबाडतात, तर संतांना धार्मिक वृत्तीचे लोक स्वतःहून अर्पण देतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान आणि अध्यात्म यांतील नेमका भेद !

‘विज्ञानाला माहिती एकत्र करून एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर शोधावे लागते. याउलट अध्यात्मात प्रगती झाल्यावर माहिती जमवावी लागत नाही, कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर तात्काळ कळते !’

भारतातील संतांचे महान कार्य !

भारतातील स्वातंत्र्यापासूनची ७५ वर्षे भारतावर राज्य केलेल्या आतापर्यंतच्या सरकारांनी नव्हे, तर संतांनीच भारताची जगात किंमत राखली आहे ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतियांनो, साधनेचे हे महत्त्व लक्षात घ्या !

‘हल्ली पाश्‍चात्त्य देशांत बहुधा भांडायला हक्काचे कुणी असावे; म्हणून लग्न करतात ! पुढे भांडणाचा कंटाळा आला की, घटस्फोट घेतात. नंतर पुन्हा लग्न करतात आणि पुन्हा घटस्फोट घेतात. असे चक्र चालू रहाते !

‘प्रार्थना’ ही देवाप्रती भाव निर्माण करण्याचे माध्यम !

‘काहींचा देवावर विश्वास नसतो, त्यामुळे ते प्रार्थना करतच नाहीत. कालांतराने थोडा फार विश्वास निर्माण झाला की, स्वेच्छेसाठी (स्वार्थासाठी) प्रार्थना करतात . . . . थोडक्यात ‘प्रार्थना’ ही देवाप्रती भावनिर्माण करण्याचे माध्यम आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुढील पिढ्यांसाठी हिंदु राष्ट्र आवश्यकच !

‘धर्मद्रोही, पुरोगामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांनी उद्या ‘विवाहित स्त्रियांनी मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये, मंगळागौर आणि वटपौर्णिमा करू नये’ इत्यादी फतवे काढल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

पुरो(अधो)गाम्यांची आदिमानवाकडे वाटचाल !

‘मानव प्रगत होतो, तसे त्याच्यात नम्रता, विचारून सर्व करण्याची वृत्ती इत्यादी गुण निर्माण होतात. पुरोगाम्यांत विचारण्याची आणि शिकण्याची वृत्ती नसते, उलट ‘मला सर्व समजते. मला वाटते तेच योग्य !’, हा अहंकार असल्याने त्यांची वाटचाल आदिमानवाकडे होत आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मानवाची प्रगती’ कशाला म्हणतात, हेही ज्ञात नसणारे विज्ञान !

‘पाश्‍चात्त्यांचे विज्ञान सांगते, ‘आदिमानवापासून आतापर्यंत मानवाने प्रगती केली आहे.’ प्रत्यक्षात मानवाने प्रगती केलेली नसून तो परमावधीच्या अधोगतीकडे जात आहे. सत्ययुगातील मानव देवाशी एकरूप होता…..

विविध क्षेत्रांतील तज्ञ आणि संत यांच्यातील भेद !

‘आधुनिक वैद्य (डॉक्टर), अधिवक्ता, लेखापाल इत्यादी सर्वच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ त्यांच्या क्षेत्रातील प्रश्‍नांची उत्तरे लगेच सांगू शकत नाहीत. ‘प्रश्‍नाचा अभ्यास, तपासण्या करतो आणि नंतर सांगतो’, असे म्हणतात.