देवाला न मानणारे हास्यास्पद बुद्धीप्रामाण्यवादी !
‘अशिक्षिताने ‘सूक्ष्म जंतू नाहीत’, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’ असे म्हणणे हास्यास्पद आहे !’
‘अशिक्षिताने ‘सूक्ष्म जंतू नाहीत’, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’ असे म्हणणे हास्यास्पद आहे !’
‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करायची असल्यास जगातील भारत सोडून इतर कोणत्याही देशात राहू नका; कारण . . . इतर सर्व देशांत रज-तमाचे प्रमाण अत्यधिक आहे. ५० टक्के आध्यात्मिक पातळीहून अधिक पातळी असलेले मात्र जगात कुठेही राहून साधना करू शकतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर विचार करणार्यांना काळजी वाटते, ‘पुढे हिंदु अल्पसंख्यांक होणार.’ याउलट आध्यात्मिक स्तरावर विचार करणार्यांना कळते की, कालचक्रानुसार पुढे हिंदु धर्म असणार आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्तीस्वातंत्र्यवाले थयथयाट करतात. ते विसरतात की, प्राणी आणि मानव यांच्यात महत्त्वाचा भेद म्हणजे प्राणी व्यक्तीस्वातंत्र्यानुसार, म्हणजे स्वेच्छेने वागतात. याउलट मानवाने . . . असे वागला, तरच तो खर्या अर्थाने मानव असतो, नाहीतर तो केवळ मानवदेहधारी प्राणी असतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘विज्ञानाने सिगारेट, दारू इत्यादींचे दुष्परिणाम सिद्ध केलेले असूनही धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी त्यांसंदर्भात मोहीम उघडत नाहीत. मटका, जुगार यांसंदर्भातही मोहीम न उघडता केवळ हिंदु धर्माविरुद्ध मोहीम उघडून स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणवतात, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
. . . हिंदु धर्म सोडून इतर धर्मांचा (पंथांचा) इतिहास पाहिला, तर त्यात विविध काळांत केलेल्या लाखो हत्यांच्या, क्रूरतेच्या, बलात्कारांच्या, जिंकलेल्या प्रदेशातील स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून विकण्याच्या सहस्रो नोंदी आहेत. फक्त अनादि काळापासून अस्तित्वात असलेल्या हिंदु धर्माच्या इतिहासात असे एकही उदाहरण नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘आंधळ्याचे ‘माझ्या पाठून या’ हे सांगणे ऐकणारे ज्याप्रमाणे त्याच्यामागून खड्ड्यात पडतात, तसे बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी यांचे आहे. ते दिशाहीनतेमुळे स्वतः खड्ड्यात पडतात आणि त्यांच्यामागून जाणारेही खड्ड्यात पडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘म्हातारपणी मुले लक्ष देत नाहीत’, असे म्हणणार्या वृद्धांनो, तुम्ही मुलांवर साधनेचे संस्कार केले नाहीत, याचे ते फळ आहे. याला मुलांबरोबर तुम्हीही उत्तरदायी आहात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘आपण आईचे दूध पितो, त्याप्रमाणे गायीचे दूध पितो; म्हणून गायीला गोमाता म्हणतात. असे असतांना गायीचीच हत्या करणे, हे आईची हत्या करण्यासारखेच झाले. ही कृतघ्नपणाची परिसीमा होय !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘व्यवहारात पैसे मिळाले की, व्यक्ती ते स्वतःकडे ठेवते; मात्र अध्यात्मात ईश्वराचे प्रेम मिळाले की, संत ते सर्वांना वाटतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले