पोलिसांना धर्म आणि नीती शिकवा !
पोलिसांना कायदे, नीती आणि धर्म शिकवा, म्हणजे ते निरपराध्यांचा छळ करण्याचे अन् खोटे अहवाल तयार करण्याचे पाप करणार नाहीत !’
पोलिसांना कायदे, नीती आणि धर्म शिकवा, म्हणजे ते निरपराध्यांचा छळ करण्याचे अन् खोटे अहवाल तयार करण्याचे पाप करणार नाहीत !’
‘पाच ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे ज्ञान देणारे सूक्ष्मातील काहीतरी आहे, हे ज्ञात नसल्याने विज्ञानवाद्यांचे संशोधन पोरखेळासारखे असते !’
धर्म बुद्धीच्या पलीकडे असल्यामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी धर्म समजून न घेता धर्मावर टीका करणे, हा धर्मद्रोहच आहे.
‘विष्णूचा अवतार असलेल्या रामाने रावणाला युद्धात मारले. त्या रावणाची ‘रावण महाराज’ या नावाची भारतात २-३ ठिकाणी मंदिरे आहेत ! म्हणूनच हिंदूंना कुणी सर्वधर्मसमभाव शिकवायला नको !’
‘त्या त्या विषयातील तज्ञ एकमेकांशी वाद करू शकतात, उदा. आधुनिक वैद्य (डॉक्टर) आधुनिक वैद्यांशी, वकील वकिलांशी; पण अध्यात्माचा काहीच अभ्यास नसलेले आणि साधना न केलेले बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मातील अधिकार्यांशी वाद करतात. यापेक्षा मूर्खपणाचे दुसरे उदाहरण आहे का ?’
हिंदूंपैकी फक्त १० टक्केच हिंदू ‘खरे हिंदू’ आहेत. बाकीचे ९० टक्के केवळ जन्महिंदू आहेत. त्यामुळे हिंदूंची स्थिती जगातच नव्हे, तर भारतातही अत्यंत केविलवाणी झाली आहे.’
‘पुस्तकात शाब्दिक ज्ञान असते, ते पुस्तकाला स्वतःला समजत नाही, तसेच पांडित्य दाखवण्यापुरते ज्यांना शाब्दिक ज्ञान असते, त्यांना त्या ज्ञानाची अनुभूती आलेली नसते.’
‘हिंदूंची धर्मनिष्ठा बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी नष्ट केल्यामुळे धर्मनिष्ठ अल्पसंख्यांक मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध बहुसंख्य हिंदूंना भारी झाले आहेत.’
‘आद्य शंकराचार्यांनी विरोधी पंडितांशी वाद-विवाद करून त्यांचा पराभव केला; मात्र हल्लीच्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि धर्मद्रोह्यांना वाद-विवाद करून हरवता येत नाही; कारण त्यांचा धर्माचा काडीइतकाही अभ्यास नसल्याने ते वाद-विवाद करण्यास पुढे येत नाहीत !’
‘धर्म पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे आहे. असे असतांना बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी धर्माविरुद्ध विधाने करणे केवळ अज्ञानदर्शक नसून तो धर्मद्रोह आहे. एखाद्या शाळेतल्या मुलाने पदवीधरावर त्याच्या ज्ञानासंदर्भात टीका करावी, असे ते आहे !’