दळणवळण बंदीचे उल्लंघन केल्यास २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात ‘दळणवळण बंदी’ लागू करण्यात आली आहे. या बंदीचे संपूर्ण देशभर समान पद्धतीने पालन व्हावे, यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार दळवळण बंदीच्या निर्बंधांचे पालन न करणार्यांवर प्रशासन भा.दं.वि. कलम १८८ नुसार कारवाई करू शकते.