वुहानमध्ये कोरोनामुक्त झालेल्या १० टक्के नागरिकांना पुन्हा कोरोनाची लागण !

बीजिंग – चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला असतांनाच वुहानमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांना पुन्हा त्याची लागण झाली आहे, असे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर यांना आढळले आहे. डॉक्टरांना यामागचे कारण अद्याप शोधता आलेले नाही. कदाचित् ‘कोरोनाला रोखण्यासाठी जी औषधे वापरली जात आहेत, त्यांचा परिणाम संपल्यानंतर पुन्हा हा विषाणू विकसित होत असावा’, असे म्हटले जात आहे. याविषयीचे वृत्त ‘दक्षिण चीन मॉर्निंग पोस्ट’ने दिले आहे.

टोंगजी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. वांग वेई यांनी सांगितले की, रुग्णालयात भरती झालेल्या कोरोना रुग्णांपैकी ५ ते १० टक्के रुग्णांना पुन्हा त्याचा संसर्ग झाला आहे. ‘पीपल्स डेली’च्या ‘हेल्थ जर्नल लाइफ टाइम्स’ने एक अहवाल प्रसिद्ध करत वरीलप्रमाणेच माहिती दिली आहे.