Film The Sabarmati Report : गोध्रा हत्याकांडावर आधारित चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’ १५ नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होणार !

मुंबई – २७ फेब्रुवारी २००२ या दिवशी अयोध्या येथून येणारी साबरमती एक्स्प्रेस गुजरातमधील गोध्रा रेल्वेस्थानकावर आली असतांना धर्मांधांनी रेल्वेच्या २ डब्यांचे दरवाजे बाहेरून बंद केले आणि त्यांना आग लावली. या आगीत ५९ कारसेवक मारले गेले. या घटनेवर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट १५ नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

The Sabarmati Report | Official Trailer | Vikrant M, Raashii K, Ridhi D | Ektaa K | InCinemas Nov 15

(सौजन्य : BalajiMotionPictures) 

या चित्रपटाचे दिग्दर्शन धीरज सरना यांनी, तर निमिर्ती शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी केली आहे. ६ नोव्हेंबर या दिवशी या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ (चित्रपटाचे छोटे विज्ञापन) मुंबईमध्ये प्रदर्शित करण्यात आला. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना धर्मांधांनी हे हत्याकांड घडवून आणले होते.

मी कोणत्याही धर्मावर कधीच भाष्य करणार नाही ! – चित्रपट निर्माती एकता कपूर

चित्रपट निर्माती एकता कपूर

या चित्रपटाविषयी माध्यमांशी बोलतांना एकता कपूर म्हणाल्या, ‘‘मी कोणत्याही राजकीय गटाशी संबंधित नाही. मी केवळ सत्याच्या बाजूने आहे. मी हिंदु आहे, याचा अर्थ मी धर्मनिरपेक्ष आहे. मी कोणत्याही धर्मावर कधीच भाष्य करणार नाही. चित्रपट प्रदर्शनाचा दिनांक आधीच घोषित करण्यात आला होता. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीशी या चित्रपटाचा काहीही संबंध नाही.’’