दळणवळण बंदीचे उल्लंघन केल्यास २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

नवी देहली – कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात ‘दळणवळण बंदी’ लागू करण्यात आली आहे. या बंदीचे संपूर्ण देशभर समान पद्धतीने पालन व्हावे, यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार दळणवळण बंदीच्या निर्बंधांचे पालन न करणार्‍यांवर प्रशासन भा.दं.वि. कलम १८८ नुसार कारवाई करू शकते. यानुसार ६ मासांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते; पण प्राप्त परिस्थितीत याहून कडक शिक्षेची आवश्यकता लक्षात घेऊन शासना००ने त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या ५१ ते ६० या कलमांचाही वापर करण्याचा आदेश दिला आहे. यानुसार दळणवळण बंदीच्या निर्णयाचे उल्लंघन करणार्‍याला आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्यात येणार आहे. या नियमावलीचे कसोशीने आणि कठोरपणे पालन करण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये अन् केंद्रशासित प्रदेश यांना दिला आहे.