सेवेला प्राधान्य देऊनही एम्.एस्.सी.च्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन साधकाने घेतलेली गुरुकृपेची प्रचीती !

परीक्षेचा निर्णय लागल्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘जे विद्यार्थी वर्षभर नियमितपणे महाविद्यालयात जायचे, त्यांना मिळालेले गुण आणि मला मिळालेले गुण यांत अधिक अंतर नाही.’ घरातील व्यक्तींना ‘मी उत्तीर्ण होणार कि नाही ?’, असे वाटायचे. केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो.

सकारात्मक आणि स्थिर राहून मुलींना साधनेला पाठिंबा देणार्‍या अन् मतीमंद मुलीची सेवा साधना म्हणून करणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या जळगाव येथील सौ. शोभा हेम्बाडे !

आईची सेवेची तळमळ पुष्कळ आहे. तिला घरी बसून करता येईल अशी सेवा दिली, तर ती कधीच त्या सेवेला नकार देत नाही. तिला आश्रमातील साधकांसाठी पोळ्या करून देणे, चादर किंवा कनाती धुणे, ‘बॅनर्स’ किंवा चादरी यांना इस्त्री करणे, अशा सेवा दिल्या जातात.

व्यष्टी साधनेला आरंभ केल्यानंतर स्वतःमध्ये पालट होणे आणि सनातन संस्थेवरील आरोपांची निरर्थकता पटवून देता येणे

मी ऑक्टोबर २०१८ मध्ये कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे झालेल्या ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’ला उपस्थित होतो. तिथे मला ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’, नामजपादी उपाय यांचे महत्त्व समजले. त्यानुसार मी व्यष्टी साधनेचे प्रयत्न करायला आरंभ केला.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ढवळी (फोंडा, गोवा) येथील चि. स्वोजस प्रभास नायक (वय ३ वर्षे) !

माघ शुक्ल पक्ष प्रतिपदा (१२.२.२०२१) या दिवशी चि. स्वोजस प्रभास नायक याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

भारतासह जगात १२ घंट्यांत ३ ठिकाणी भूकंपाचे धक्के

भारतातील मिझोराममध्येही भूकंपाचा झटका जाणवला. चंपाई येथे ३.१ रिक्टर स्केल भूकंपाचा झटका जाणवला.

कळमपुरी (जिल्हा हिंगोली) येथील पालिकेच्या उद्यानाला आग लागल्याने खेळण्याच्या साहित्याची हानी

पालिकेच्या उद्यानामधील वाळलेल्या गवताला आग लागून १० फेब्रुवारी या दिवशी खेळण्याच्या साहित्याची अनुमाने ३ लाख रुपयांची हानी झाली आहे.

गावठी बंदूक आणि ३ जिवंत काडतुसे बाळगणार्‍यासह २ जण पोलिसांच्या कह्यात

सांगली जिल्ह्यातील वांगी गावातील एका सराईत गुन्हेगाराने ही बंदूक ठेवण्यास दिल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून सराईत गुन्हेगाराला कह्यात घेतले.

पुण्यात भरदिवसा गोळ्या झाडून गुन्हेगाराची हत्या !

भरदिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येसारखी घटना घडणे हे पोलीस खात्याला लज्जास्पद !

सांगली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये आग प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यास अपयशी !

शासकीय रुग्णालये आग प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यास अपयशी का ठरली ? याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. यामध्ये दोषी असणार्‍यांवर कठोर कारवाई झाल्यासच अशा चुका पुन्हा होणार नाहीत.

राजस्थानच्या रा.स्व. संघाच्या जिल्हाचालकांवर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण !

काँग्रेसच्या राज्यात रा.स्व. संघाच्या संघचालकांवर प्राणघातक आक्रमण होते; मात्र काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी पार्टी, बसप, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष किंवा निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत !