सेवेला प्राधान्य देऊनही एम्.एस्.सी.च्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन साधकाने घेतलेली गुरुकृपेची प्रचीती !

‘श्री. संदीप ढगे याने लिहिलेल्या या लेखावरून त्याची साधनेची तळमळ आणि साधनेचे महत्त्व लक्षात येईल. याबद्दल त्याचे कौतुक करावे, तेवढे थोडे ! ‘त्याची साधनेतील पुढील प्रगती जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले                  

श्री. संदीप ढगे,

१. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करून प्रतिदिन महाविद्यालयात १ घंटा उशिरा जाणे आणि शिक्षकांनी ‘याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील’, अशी जाणीव करून देणे

‘मी ‘एम्.एस्.सी.’चे शिक्षण घेतांना रसायनशास्त्र हा विषय घेतला होता. हा विषय सोलापूर विद्यापिठात शिकवला जातो. गेल्या एक वर्षापासून माझ्याकडे दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा असल्याने ती सेवा करून मला विद्यापिठात पोचायला प्रतिदिन १ घंटा विलंब होत होता. शिक्षकांचे १ घंटा शिकवून झाल्यानंतर मी वर्गात जात होतो. त्या विषयाच्या शिक्षकांनी कंटाळून मला सांगितले, ‘‘मी तुला यापुढे काहीच बोलणार नाही. तुला जे करायचे ते कर; पण याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील.’’ त्या वेळी मी गुरुदेवांना प्रार्थना केली.

२. वर्गात अनुपस्थित रहाणे

राष्ट्रीय आंदोलने, हिंदु राष्ट्र-जागृती सभा, तसेच अन्य प्रासंगिक सेवा यांमुळे मी पुष्कळ वेळा महाविद्यालयात जात नसे. वर्गात माझीच अनुपस्थिती अधिक होती.

३. २४.६.२०१९ या दिवशी एम्.एस्.सी.च्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेचा निर्णय लागला. गुरुकृपेने मला ६५ टक्के गुण मिळून मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो.

४. वर्षभर नियमितपणे महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थी आणि साधकाला मिळालेल्या गुणांत अंतर नसणे अन् घरातील व्यक्तींनी सत्सेवेचे महत्त्व जाणणे

परीक्षेचा निर्णय लागल्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘जे विद्यार्थी वर्षभर नियमितपणे महाविद्यालयात जायचे, त्यांना मिळालेले गुण आणि मला मिळालेले गुण यांत अधिक अंतर नाही.’ घरातील व्यक्तींना ‘मी उत्तीर्ण होणार कि नाही ?’, असे वाटायचे. केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. त्यामुळे घरातील व्यक्तींनाही सत्सेवा करण्याचे महत्त्व लक्षात आले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता’ !

– गुरुसेवक,

श्री. संदीप ढगे, सोलापूर (३.७.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक