सेवा निवृत्तीच्या दिवशीच कर्मचार्‍यांना त्यांचे सर्व देय लाभ मिळणार ! – कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई

सेवा निवृत्तीच्या दिवशीच कर्मचार्‍यांना त्यांचे देय असलेले सर्व लाभ देण्यात येतील, असे आश्वासन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनी दिले. पालिका मुख्यालयात आयोजित कर्मचारी सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमात बोलत होते.

PEN NO For Goa Students : गोव्यात पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘परमनंट एज्युकेशन नंबर’ ! – शिक्षण खात्याचा निर्णय

शाळा मध्येच सोडून जाणार्‍या विद्यार्थ्यांना शोधून काढून त्यांना पुन्हा शैक्षणिक क्षेत्रात सामावून घेण्याच्या केंद्राच्या योजनेच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या शिक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !

उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २ मे या दिवशी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. उद्धव ठाकरे निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या कोल्हापूर दौर्‍यावर आहेत.

Loksabha Elections 2024 : गोव्यात ८८ आदर्श, ८० पर्यावरणपूरक आणि ४० ‘पिंक’ मतदान केंद्रे

गोव्यातील मुख्य निवडणूक कार्यालयाने मतदारांची अंतिम सूची प्रसिद्ध केली आहे. यामध्ये उत्तर गोव्यात ५ लक्ष ८० सहस्र ७१०, तर दक्षिण गोव्यात ५ लक्ष ९८ सहस्र ९३४ मतदार मिळून एकूण ११ लक्ष ७९ सहस्र ६४४ मतदारांचा समावेश आहे.

Boycott Loksabha Elections 2024 : ग्रामस्थांनी निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घातल्यानंतर शिरवल (सिंधुदुर्ग) गावातील रस्त्याच्या कामाला प्रारंभ !

निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घातल्यावर कामे होतात, हे लक्षात आल्याने आता सर्व ठिकाणच्या नागरिकांनी अशी कृती केली, तर प्रशासन काय करणार ? सार्वजनिक कामांसाठी नागरिकांना निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घालण्याची वेळ येते, हे प्रशासनासह लोकप्रतिनिधींना लज्जास्पद !

Mumbai HC Slams Goa Govt : सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी भूमीवर अतिक्रमण करणे सहजतेने शक्य ! – उच्च न्यायालयाचे सरकारवर ताशेरे

प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आणि अधिकार्‍यांच्या डोळ्यांसमोर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होते, हे आश्चर्यकारक आहे. यासंबंधी न्यायालयात याचिका प्रविष्ट होईपर्यंत प्राधिकरणाचे अधिकारी याविरोधात काहीही करू इच्छित नाही, हे त्याहून धक्कादायक !

प्राचीन मंदिरांमुळे देशाचा इतिहास आणि संस्कृती यांचे आकलन होते ! – इंद्रनील बंकापुरे, व्याख्याते

बंकापुरे पुढे म्हणाले की, स्थापत्य आणि पौराणिकत्व यांतून मंदिरे साकारली जातात. मंदिरे बांधण्यात स्थपतींचे (स्थापत्य करणारे) स्थान महत्त्वाचे आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या शाळेतील शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या इस्रो सहलीला अद्याप मुहूर्तच नाही !

महापालिकेच्या शाळेतील शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ची सहल घडवली जाणार होती

हिंदु समाजाकडून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक !

२८ एप्रिलला एका मुसलमान व्यक्तीने रुईकर वसाहत येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीसमोरील जागेत नमाजपठण केले होते.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घेतली सदिच्छा भेट !

योगी आदित्यनाथ यांच्या सभेला ते धारकर्‍यांसह उपस्थित होते. यापूर्वी पू. भिडेगुरुजी यांनी २७ एप्रिल या दिवशी कोल्हापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली होती.