वानाडोंगरी (नागपूर) येथे वेणा नदीकाठी सापडली ८०० आधारकार्ड !
नागपूर येथील हिंगणा तालुक्यात वेणा नदीच्या काठालगत ८०० आधारकार्ड फेकून दिलेली आढळली आहेत. पोलिसांनी ती कह्यात घेतली असून पुढील कार्यवाही चालू केली आहे.
नागपूर येथील हिंगणा तालुक्यात वेणा नदीच्या काठालगत ८०० आधारकार्ड फेकून दिलेली आढळली आहेत. पोलिसांनी ती कह्यात घेतली असून पुढील कार्यवाही चालू केली आहे.
अशा घटनांमुळे हिंदूंच्या सणांविषयी चुकीची प्रतिमा निर्माण होते आणि काही हिंदूच अन्य धर्मियांच्या प्रचाराला बळी पडून हिंदु धर्मापासून दूर जातात. त्यामुळे हिंदूंना आधी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !
नवयुवक हौशी मंडळाच्या वतीने नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मडगाव येथे श्रीकृष्णपूजन आणि नंतर मिरवणूक काढण्यात आली. यावर्षीचा ५३ वा श्रीकृष्ण पालखी उत्सव होता.
तालुक्यातील वारंगांची तुळसुली येथे २८ ऑक्टोबर या दिवशी गोवत्स द्वादशी अर्थात् वसुबारसनिमित्त श्री. आनंद वारंग यांच्या गोशाळेत सवत्स धेनूचे पूजन करण्यात आले.
मनसेच्या पाठिंब्याने राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असे विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले. या वेळी राज ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीतील नेत्यांप्रमाणे आम्ही सत्ता मिळवण्यासाठी स्वार्थी भूमिका घेतलेली नाही.
आम्ही कायम विकासाचे राजकारण केले आहे. महायुतीला निवडणुकीत २०० हून अधिक जागा मिळतील, असा आत्मविश्वास एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला.
काणकोण तालुक्यात यासंबंधी बागायतदार बाजाराच्या दुकानावर, चावडी, चाररस्ता आदी ४ रहदारीच्या ठिकाणी लावण्यात आलेले ‘हलालमुक्त दिवाळी साजरी करूया’, हे फलक पाहून धर्माभिमान्यांनी समाधान व्यक्त करून प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
‘सकल मराठा परिवारा’द्वारे ‘एक दिवा स्वराज्याच्या देवासाठी’ उपक्रम !
‘एबीपी माझा’ या वाहिनीवर बोलतांना शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना सुतळी बाँबशी केली. तो फोडायला धाडस लागते आणि एकदाच फुटतो; पण क्रांती घडवतो, असे ते म्हणाले.
सर्वसामान्याला लाखाचे कोटी करण्यात संपूर्ण आयुष्य वेचावे लागते; पण राजकारणात लाखाचे कोटीत जायला काही दिवसांचा कालावधीही पुरेसा असतो, हे या उदाहरणांवरून लक्षात येते. हे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे आहे !