कळंगुट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी आणि श्री शांतादुर्गादेवीच्या जागेत मलनिस्सारण प्रकल्प होऊ न देण्यासाठी प्रयत्नरत रहाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन !

अमेरिकेकडून पाकपुरस्कृत लष्कर-ए-तोयबासह ८ आतंकवादी संघटना ‘विदेशी आतंकवादी संघटने’च्या सूचीत कायम !

अमेरिकेने लष्कर-ए-तोयबा या पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी संघटनेला ‘परदेशी आतंकवादी संघटने’च्या सूचीमध्ये कायम ठेवले आहे. तसेच पाकमधील ‘लष्कर-ए-झांग्वी आणि अन्य ६ जिहादी आतंकवादी संघटनांनाही  जागतिक आतंकवादी संघटनेच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

‘कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच !’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मादिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.

औरंगजेब हा धर्मनिरपेक्ष नव्हे, तर धर्मांध आक्रमक होता ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल, तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत. हे वागणे ‘धर्मनिरपेक्ष’ नव्हे,’ अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षावर केली आहे.

अमेरिकेच्या संसदेजवळ बंदूक आणि ५०० काडतूसे यांसह एकाला अटक

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा येत्या २० जानेवारीला शपथविधी सोहळा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी अमेरिकेच्या संसदेजवळ एका व्यक्तील बंदूक आणि ५०० काडतूसे यांसह अटक केली.

अयोध्येतील मुसलमानही देत आहेत श्रीराममंदिरासाठी देणग्या !

मुसलमान देणग्या देत आहेत; म्हणून हिंदूंनी हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. ‘मंदिरांवर पुन्हा आक्रमण करू’ अशा धमक्याही धर्मांधांनी दिल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे संरक्षणही होणे महत्त्वाचे आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे !

मगो पक्षाची नूतन केंद्रीय समिती घोषित

१७ जानेवारीला झालेल्या केंद्रीय समितीच्या निवडणुकीत श्री. दीपक ढवळीकर ४०९ मतांनी विजयी ठरल्याने त्यांची पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली.

चीनमध्ये आईस्क्रीममध्येही आढळले कोरोनाचे विषाणू !

चीनमध्ये आईस्क्रीममध्येही कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. या आईस्क्रीमच्या ३९० डब्यांची विक्री करण्यात आली असून खरेदी करणार्‍या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

श्रीराममंदिर उभारणीसाठी अवैध देणगी गोळा केल्यावरून राष्ट्रीय बजरंग दलाच्या विरोधात गुन्हा नोंद

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या श्रीराममंदिरासाठी अवैधरित्या देणगी गोळा केल्याच्या आरोपावरून येथील पोलिसांनी राष्ट्रीय बजरंग दलाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

बेळगाव येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेलेले आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांना कर्नाटक पोलिसांनी रोखले

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर कोगनोळी टोलनाक्यावर अडवले. त्यांनी कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला आहे.