मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मादिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, ‘महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणार्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मादिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांचा त्याग, समर्पण यांत होरपळून आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा ! कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे, हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत.’
महापुरुषांना जातीपातींमध्ये न अडकवता त्यांच्या विचारांचे जतन करा ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २६.०७.२०२६)
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती