निधन वार्ता
सनातनच्या साधिका श्रीमती शीतल नेर्लेकर यांची आई श्रीमती पद्मा अरविंद आचार्य यांचे निधन झाले.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनामुळे केवळ ४ दिवसांत ५ कर्मचार्यांचा मृत्यू !
सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात धक्कादायक गोष्ट म्हणजे मृत्यू झालेल्या रुग्णांतील काही जणांचे वय हे केवळ ३५ ते ४० वर्षाच्या दरम्यान आहे.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शासन निर्बंध अधिक कडक करणार, त्यासाठी कार्यवाही आराखडा सज्ज ठेवा ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री (ग्रामीण)
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यशासन निर्बंध अधिक कडक करणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासंदर्भात सोलापूर येथे महापौर कार्यालयात बैठक
आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांनी बागेवाडीकर आयुर्वेदिक रुग्णालय कोविड १९ सेंटरसाठी कह्यात घेण्यासाठी पहाणी केली.
नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांचा मृत्यू !
आरोग्यक्षेत्राच्या व्यवस्थापनाचे धिंडवडे काढणारी घटना ! एकीकडे ऑक्सिजनअभावी, तर दुसरीकडे उपलब्ध ऑक्सिजनच्या गळतीमुळे नागरिकांचा मृत्यू होणे, यापेक्षा आरोग्ययंत्रणेला लज्जास्पद दुसरे काय असू शकते ? या घटनेस उत्तरदायी असलेल्यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !
चाकण (जिल्हा पुणे) येथील एका खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने ३ रुग्णांचा मृत्यू !
चाकणमधील एका खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. २० अत्यवस्थ रुग्णांना २० एप्रिलच्या पहाटे तातडीने अन्यत्र हालवण्यात आले.
अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने डोळ्यांत तेल घालून काम करावे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नाशिक येथील दुर्घटनेचे सखोल अन्वेषण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश, प्रत्येक मृताच्या कुटुंबियांसाठी ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित
दमोह (मध्यप्रदेश) येथे कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांनी चोरून नेले ऑक्सिजन सिलिंडर !
आज ऑक्सिजनसाठी चोर्या करणार्या लोकांना उद्या याहून अधिक आपत्काळात पाणी, अन्न यांसाठी अशी वणवण करावी लागली, तर आश्चर्य वाटू नये !
कर्नाटकातील कलबुर्गी येथे ऑक्सिजन सिलिंडर लावलेल्या रुग्ण महिलेची रुग्णालयात भरती होण्यासाठी वणवण !
आज ऑक्सिजनसाठी वणवण करणार्या लोकांना उद्या याहून अधिक आपत्काळात पाणी, अन्न यांसाठी अशी वणवण करावी लागली, तर आश्चर्य वाटू नये !