सोलापूर, २२ एप्रिल (वार्ता.) – शहरातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे उपाययोजना करण्यासंदर्भात सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी २१ एप्रिल या दिवशी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये शहरातील सद्य परिस्थितीविषयी आढावा घेण्यात आला. या वेळी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते श्रीनिवास करली, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, आरोग्य अधिकारी बिरुदेव दूधभाते यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
१. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असले तरी भरणे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत याचे भान त्यांनी ठेवावे, असा सल्ला माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी या वेळी दिला.
२. आमदार विजयकुमार देशमुख आणि महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांनी बागेवाडीकर आयुर्वेदिक रुग्णालय कोविड १९ सेंटरसाठी कह्यात घेण्यासाठी पहाणी केली, तसेच भाग्यनगर रस्त्यावरील शिवदारे मंगल कार्यालय या ठिकाणीही कोविड १९ सेंटरसाठी जागेची पहाणी केली.