हावडा एक्सप्रेसमधील कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर नंदुरबार येथील हिंदुत्वनिष्ठांच्या साहाय्यामुळे घडले माणुसकीचे दर्शन !

हिंदुत्वाचे कार्य करणारे निर्दयी आणि आक्रमक असल्याचे खोटे चित्र साम्यवादी विचारवंत अन् साहित्यिक यांच्याकडून रंगवले जाते; मात्र हिंदूंवर टीका करणाऱ्यांना नंदुरबारच्या घटनेतून चपराकच मिळेल !

यवतमाळ जिल्ह्यात खासगी रुग्णालयांना ‘कोविड सुविधा पोर्टल’वर माहिती भरणे बंधनकारक !

शासकीय रुग्णालयासमवेतच खासगी कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना योग्य उपचार, बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर आदी गोष्टींची माहिती होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘covidsuvidhaytl’ या नावाने पोर्टल चालू केले आहे.

भिवंडी येथे कोरोनाचा बनावट निगेटिव्ह अहवाल सिद्ध करणार्‍या धर्मांधांच्या टोळीतील आणखी एकास अटक !

आपत्काळातही स्वार्थापोटी जनतेच्या जिवावर उठलेल्या अशा गुन्हेगारांना कडक शासन केले पाहिजे !

वाडा (जिल्हा पालघर) तालुक्यातील लाचखोर बालविकास प्रकल्प अधिकार्‍याला अटक !

वाडा तालुक्यातील डाहे गावातील अंगणवाडी केंद्रात काम करणार्‍या एका मदतनीस महिलेला कामावर कायमस्वरूपी करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी गोरक्ष खोसे यांनी २१ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.

रेमडेसिविरच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये सलाईनचे पाणी भरून २२ सहस्र रुपयांना विक्री !

शिवाजीनगर पोलिसांनी २ आरोपींना अवैधरित्या रेमडेसिविर इंजेक्शन विकतांना पकडले होते. या आरोपींकडून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे रेमडेसिविर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये सलाईनचे पाणी टाकून हे बनावट इंजेक्शन २२ सहस्र रुपयांना विकले जात असे.

महाराष्ट्रात आणखी ५ दिवस मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता !

सध्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिणेकडील अन्य भागांत अवकाळी पावसाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे या ठिकाणी पुढील पाच दिवसांत वादळी वारा आणि मेघगर्जना यांसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कल्याण येथे धर्मांधाकडून ४ लाखांहून अधिक किमतीचा गांजा हस्तगत !

महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सापळा रचून रहमत युसूफ पठाण या धर्मांधाला अटक केली आहे. त्याच्याकडून २७ किलोहून अधिक वजनाचा गांजा हा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे.

जलपर्णी काढण्यासाठी मनपा करत असलेली उपाययोजना तात्पुरती ! – पर्यावरणशास्त्रज्ञ सचिन पुणेकर यांची टीका

पुणे शहरातील जलपर्णी काढण्यासाठी मनपाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा व्यय

बैठकीत विनामास्क सहभागी झालेल्या थायलंडच्या पंतप्रधानांकडून दंड वसूल !

बँकॉकमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. बँकॉकचे राज्यपाल असविन क्वानमुआंग यांनी पंतप्रधानांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अमेरिकेत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना मास्क लावण्याची आवश्यकता नाही !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीदेखील ट्वीट करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वी इस्रायलमध्येही मास्क न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.