पी.एफ्.आय.वर बंदी घालण्याची सिद्धता चालू आहे ! – केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

पी.एफ्.आय. ‘या संघटनेचे अनेक पदाधिकारी बंदी घालण्यात आलेली संघटना सिमीशी संबंध ठेवून आहेत.

राष्ट्रनिष्ठ आणि हिंदुत्वाची बाजू मांडणारे पत्रकार रोहित सरदाना यांचे निधन

प्रसिद्ध पत्रकार आणि सूत्रसंचालक रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे नोएडा येथील मेट्रो रुग्णालयात निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता; मात्र नंतर त्यांचा अहवाल नकारात्मक आला होता.

अकोट (अकोला) येथील वारकरी संप्रदायाचे मृदंगाचार्य ह.भ.प. विठ्ठल महाराज साबळे आणि त्यांची पत्नी गोकुळाबाई साबळे यांचे हृदयविकाराने निधन !

ह.भ.प. साबळे महाराज हे मृदंगवादन, कीर्तन, भागवत, विशेषतः भाषण शैलीसाठी सुप्रसिद्ध होते. त्यांनी तारुण्यामध्ये श्रीक्षेत्र आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार केला.

इस्रायलमध्ये धार्मिक उत्सवाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ४० ठार

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही मोठी दुर्घटना असल्याचे म्हटले. कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथील केल्यानंतर या कार्यक्रमासाठी १० सहस्रांहून अधिक जणांनी उपस्थिती दर्शवली होती.

१ मेपासून निवडक केंद्रांवर प्राथमिक स्वरूपात लसीकरण चालू करता येईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरण चालू करता येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ३० एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

हनुमान जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये विविध ‘ऑनलाईन’ उपक्रमांचे आयोजन

हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाचे तत्त्व १ सहस्र पट अधिक असते. हे लक्षात घेऊन धर्मशिक्षणवर्ग आणि सत्संग यांमध्येही संकट निवारणासाठी हनुमानाच्या पूजनाचे शास्त्र, त्याच्या जपाचे महत्त्व, साडेसाती निवारणासाठी मारुतीची पूजा कशी करावी आदींविषयी माहिती सांगण्यात आली.

आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाहीत !

नागपूरमधील ८५ वर्षीय नारायण दाभाडकर यांनी रुग्णालयातील स्वतःचा बेड दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाला दिला आणि घरी गेल्यावर ३ दिवसांनी त्यांचे निधन झाले. ही घटना सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चिली गेली.

रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचा तुटवडा हे राज्यशासनाचे अपयश ! – किरीट सोमय्या, भाजप

कल्याण पश्‍चिम येथे माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी श्‍वास हॉस्पिटल आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या लाल चौकी येथील कोविड केंद्राला भेट देऊन पाहणी केली, तसेच लाल चौकी येथील स्मशानभूमीलाही भेट देऊन आढावा घेतला.

पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांत ‘रेमडेसिविर’चे रुग्णांवर दुष्परिणाम !

पालघर जिल्ह्याला पुरवठा केलेल्या रेमडेसिविरच्या ६५० कुप्यांचा वापर न करण्याचे आस्थापनाने जाहीर केले होते; पण आदेश मिळण्यापूर्वीच खासगी रुग्णालयांनी २३२ रुग्णांवर रेमडेसिविर औषधाचा वापर केला. त्यामुळे १३ रुग्णांना त्रास झाला.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याच्या संख्येत घट; मात्र मृत्यूचे प्रमाण कायम

मुंबईमध्ये दिवसाला ९ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते; मात्र मागील ५ दिवसांची आकडेवारी पहाता मुंबईमध्ये दिवसाला कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची सरासरी संख्या ४ सहस्र ५०३ इतकी आहे.