पी.एफ्.आय.वर बंदी घालण्याची सिद्धता चालू आहे ! – केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

 नवी देहली – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या जिहादी संघटनेवर बंदी घालण्याची सिद्धता चालू असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले, ‘या संघटनेचे अनेक पदाधिकारी बंदी घालण्यात आलेली संघटना सिमीशी संबंध ठेवून आहेत.’ यावर न्यायालयाने विचारले, ‘पी.एफ्.आय.वर बंदी घालण्यात आली आहे का ?’ त्यावर मेहता यांनी सांगितले की, काही राज्यांमध्ये या संघटनेवर बंदी आहे. माझ्या माहितीनुसार केंद्र सरकार या संघटनेवर बंदी घालण्याची सिद्धता करत आहे.