पुन्हा राष्ट्राध्यक्ष झालो, तर अमेरिकेत हिंदूंच्या नरसंहाराचे स्मारक बनवेन !

हिंदू, भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. जर मी पुन्हा राष्ट्राध्यक्ष झालो, तर वॉशिंग्टनमध्ये ‘हिंदू होलोकॉस्ट’ स्मारक (हिंदूंच्या नरसंहाराचे स्मारक) बनवेन. 

समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांना ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार आझम खान यांनी आक्षेपार्ह विधाने केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. याचसमवेत ६ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला.

श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या वतीने वाडा येथील आदिवासी भागांत फराळ आणि फटाके यांचे वाटप

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेले श्रीमंतयोगी प्रतिष्ठान आज मोठ्या संख्येने युवकांना एकत्र करून सामजिक क्षेत्रात कार्य करत आहे. संघटना बरेच विषय हाताळून हिंदु धर्म कसा अबाधित राहील, या दृष्टीने प्रयत्न करत आहे.

आसाममध्ये ३ स्वीडिश नागरिकांना ख्रिस्ती प्रार्थनासभेतून घेण्यात आले कह्यात !

व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली २ महिलांसह ३ स्वीडिश नागरिकांना पोलिसांनी नुकतेच कह्यात घेतले. त्यांना अटक न करता लवकरच स्वीडनच्या दूतावासाकडे सोपवण्यात येईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील विश्‍व हिंदु परिषदेच्या नेत्याची हत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांध मुसलमानाला अटक

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदुत्वनिष्ठांवर अशा प्रकारे आक्रमण करण्याचे धर्मांधांचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

‘न्यूज १८ इंडिया’ या वृत्तवाहिनीला ५० सहस्र रुपयांचा दंड

‘न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने (‘एन्.बी.डी.एस्.ए.’ने) ‘न्यूज १८ इंडिया’ या वृत्तवाहिनीला चर्चासत्रात सहभागी हिजाब समर्थक मुसलमानांना ‘अल् कायदा’ या आतंकवादी संघटनेचे समर्थक असल्याचे म्हटल्याने ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कोणत्याही पक्षाने परमाणु पर्यायाचा विचार करू नये ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू यांच्याशी दूरभाषवर नुकतीच चर्चा केली. रशिया-युक्रेन संघर्षासंदर्भात भूमिका स्पष्ट करतांना सिंह म्हणाले की, कोणत्याही पक्षाने परमाणु पर्यायाचा विचार करू नये.

अंदमानच्या माजी मुख्य सचिवांच्या निवासस्थानी २० महिलांना नेण्यात आल्याची माहिती

अंदमान आणि निकोबारमध्ये लैंगिक शोषणाच्या बदल्यात काही महिलांना नोकरी देण्यात आल्याचा घोटाळा समोर आला आहे. अंदमान आणि निकोबारचे माजी मुख्य सचिव जितेंद्र नरेन अन् कामगार आयुक्त आर्.एल्. ऋषी यांच्याविरोधात २१ वर्षीय महिलेने सामूहिक बलात्कार आणि लैंगिक अत्याचारांचे आरोप केले आहेत.

गया (बिहार) येथे अज्ञातांकडून मंदिरातील मूर्तींची तोडफोड !

पुजारीही बेपत्ता
भूमाफियांवर संशय

प्रभु श्रीरामाच्या मार्गावरून चालल्यावरच द्वेष नष्ट होईल ! – न्यूयॉर्कचे महापौर

प्रभु श्रीरामाचे महत्त्व समजणारे पाश्‍चात्त्य अमेरिकेतील प्रतिष्ठित राजकारणी कुठे आणि भारतावर ६० वर्षांहून अधिक काळ राज्य करूनही ‘श्रीराम अस्तित्वातच नव्हता’, असे प्रतिज्ञापत्र सादर करणारी हिंदुद्वेष्टी काँग्रेस कुठे ?