अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे आश्वासन !
फ्लोरिडा (अमेरिका) – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या येथील ‘मार-ए-लागो रिसॉर्ट’मध्ये अनिवासी भारतियांसाठी ‘रिपब्लिकन हिंदू कोलिशन’ या संघटनेच्या आयोजनाखाली दीपावली साजरी केली. वर्ष २०२४ च्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते पुन्हा उभे रहाणार असल्याचे म्हटले जाते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी म्हटले की, माझे हिंदू, भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. जर मी पुन्हा राष्ट्राध्यक्ष झालो, तर ‘रिपब्लिकन हिंदू कोलिशन’ संस्थेचे संस्थापक शलभ कुमार यांना भारताचे राजदूत बनवेन. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ बनवेन. वर्ष २०१६ आणि वर्ष २०२० च्या निवडणुकीत मला हिंदूंचे मोठे समर्थन मिळाले होते. राष्ट्राध्यक्ष झाल्यास मी वॉशिंग्टनमध्ये ‘हिंदू होलोकॉस्ट’ स्मारक (हिंदूंच्या नरसंहाराचे स्मारक) बनवेन.
सौजन्य : editorji